म्हणून श्राद्ध केल्यानंतर कावळ्यालाच खाऊ घातले जाते; जाणून घ्या वैज्ञानिक कारण

या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन)है फक्त भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळात प्रत्येक सु-संस्कारी मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल. हे पूर्वीच्या आपल्याच संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.

    जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ वड आणि पिंपळ है दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनीसुद्धा मान्य केले आहे. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लाऊ शकतो परंतु फक्त वड आणि पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात, (बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळेच, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ है वृक्ष येतात.

    या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन)है फक्त भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळात प्रत्येक सु-संस्कारी मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल. हे पूर्वीच्या आपल्याच संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते. आपल्या संस्कृतीतील ऋषि-मुनि हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरु करण्यात आली.

    आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे. फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते.  कोरोनाने  आँक्सीजनचे महत्त्व समाजाला पटवून दिलेच आहे. जर का कावळ्यांना घरा घरातून पितरांच्या नावाने खायला नाही मिळाले तर आपल्या मागील वंशाचे नातू-पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा. कधीच, कुठेही  कोणतेही सरकार आँक्सीजनची पुर्व तयारी करा हे सांगणार नाही .

    (माहिती आवडल्यास फॉरवर्ड करा)