…म्हणून बुधवारी मुलीला सासरी पाठवत नाही; जाणून घ्या शास्त्रीय कारण

ज्यांच्या लग्नाला जास्त दिवस झालेले नाहीत त्यानी कधीच मुलींना बुधवारी सासरी पाठवू नये. कारण...

  आपल्या प्रवासात कुठल्याही प्रकारचा त्रास नको म्हणून लोक बरेच उपाय करत असतात. त्यामध्ये बर्‍याच लोकांचा प्रवास हा सुखदायक ठरतो तर बर्‍याच वेळा प्रवास फारच जास्त प्रमाणात कष्टकारक असतो. अशी मान्यता आहे की हिंदू धर्मातील शास्त्रानुसार असे काही दिवस आहेत की ज्या दिवशी प्रवास करणे टाळले पाहिजे.

  त्याच प्रमाणे हिंदू धर्मातील ज्योतिष्यामध्ये नवविवाहित मुलींबद्दल देखील अशा काही गोष्टी सांगितल्या जातात की, खास करून ज्यांच्या लग्नाला जास्त दिवस झालेले नाहीत त्यानी कधीच मुलींना बुधवारी सासरी पाठवू नये. कारण माहितीनुसार, बुध आणि चंद्र एकमेकांचे शत्रू मानले जातात. कारण नवीन वधूचे बुधवारी प्रवास करणे अशुभ मानले जाते.

  तसेच आपल्या देशात सर्व प्रकारच्या तसेच विविध धर्माचे लोक आहेत आणि प्रत्येक धर्माची स्वतंत्र अशी परंपरा आणि रूढी आहे असे सांगितले जाते. मुलीचे लग्न झाल्यानंतर तीची पाठवणी असते तसेच जेव्हा ती माहेरी येते, आणि परत सासरी जाते, तेव्हाही तिची पाठवणी केली जाते. पण ही पाठवणी तिच्या माहेरच्या लोकांनी बुधवारच्या दिवशी अजिबात करू नये. कारण त्याची काही शास्त्रात महत्वाची कारणे सांगितली आहेत.

  यामध्ये हिंदु शास्त्रानुसार बुधवारचा दिवस हा मुलीला सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानला जातो , तसेच जर बुधवारी मुलीला सासरी पाठवले गेले तर अनेक अपशकून होऊ शकतात त्यामध्ये असे केल्याने त्या नवविवाहित मुलीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यांमुळे तुमचे जीवन दुःखी होऊ शकते.

  जर मुलीच्या पत्रिकेत बुध ग्रह भारी असेल तर अजिबात बुधवारी हे काम करू नये. तसेच दुसरे कारण म्हणजे विवाहित मुलगी आपल्या सासरी बुधवारच्या दिवशी गेल्यास तिच्या सासरच्या नात्यांवर परीणाम होण्याची शक्यता असते. मुलीच्या लग्नानंतर प्रत्येक आई वडीलांना वाटत असते की आपल्या मुलीला सासरी योग्य वागणूक दिली जावी.

  वरील माहिती ही धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.