…म्हणून रविवारी तुळस तोडू नये; जाणून घ्या तुळशीच्या रोपाविषयी ७ तथ्य

जर घरात लावलेले तुळशीचे रोप काही कारणात्सव सुकले तर ते लगेच नदी अथवा तलावामध्ये विसर्जित करा.कारण तुळशीचे सुकलेले रोप घरात ठेवणे शुभ नाही.

  भारतीय वेदशास्रात तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचे स्थान देण्यात आले आहे.अनेक घरात आजही अंगणात तुळशीचे रोप लावून त्याची नियमित पूजा करण्यात येते.दरवर्षी तुलसीविवाह झाल्यावरच घरात लग्नासारखे मंगल विधी करण्यात येतात. अध्यात्मिक महत्व असल्याने आजकाल शहरात देखील प्रत्येक घरी अगदी छोटेसे तरी तुळसीचे रोप आवर्जून लावण्यात येते.

  आयुर्वेदामध्ये तर तुळस या वनस्पतीला संजीवन औषधीचे स्थान देण्यात आलेले आहे.कारण तुळशीच्या पानांचे फायदे असून त्यात विविध औषधी गुणधर्म आढळून येतात. जे अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्यास मदत करतात.तुळसीचे रोप घरी लावल्याने आरोग्य तर सुधारतेच शिवाय घराबाहेरील कुदृष्टीपासून देखील कुटूंबियांचा बचाव होतो असे मानले जाते.

  1. रविवारी तुळशीच्या रोपाला स्पर्श करु नका 

   रविवारी कधीच तुळसीच्या रोपाची पूजा करु नका अथवा तुळशीची पाने तोडू देखील नका.कारण तुळशीला साक्षात राधेचा अवतार असल्याचे मानले जाते.असे मानले जाते की रविवारी तुळस विष्णु देवासाठी व्रत करते.म्हणूनच रविवारी तुळसीची पाने तोडू नयेत.अध्यात्मिक शास्त्रानूसार तुळशीची पाने एकादशी आणि ग्रहण काळात देखील तोडू नयेत.

    

   2. तुळशीची पाने कधीच चावून खाऊ नका 

  तुळशीची पाने कधीच चावून खाऊ नयेत.यामागील एक महत्वाचं अध्यात्मिक कारण असं की तुळस ही एक पवित्र वनस्पती आहे.घरोघरी तिची पूजा करण्यात येते.आणि दुसरं आर्युर्वेदिक कारण असं की तुळशीच्या पानांमध्ये पारा हा धातू असतो.त्यामुळे तुळशीची पाने चावल्यास त्यातील पारा दातांवर लागून दातांचे नुकसान होऊ शकते.म्हणूनच तुळशीची पाने चावण्याऐवजी ती गिळावीत अथवा चोखावीत.यामुळे तुमचे अनेक आजार बरे होऊ शकतात.

  3. शंकर आणि गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करु नये 

  नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की शिवलिंग व गणपती बाप्पाची पूजा करताना कधीच तुळस वापरु नका, कारण या देवांची पूजा करताना तुळस वापण्यास शास्त्रात मनाई करण्यात आली आहे.एका पुराणातील कथेनूसार भगवान शंकराने तुळशीमातेचा पती म्हणजेच दैत्यांचा राजा शंखचूड याचा वध केला होता. ज्यामुळे शंकराच्या पूजेमध्ये तुळस वापरली जात नाही.

  4. तुळशीचे सुकलेले रोप घरात ठेवणे योग्य नाही.

  जर घरात लावलेले तुळशीचे रोप काही कारणात्सव सुकले तर ते लगेच नदी अथवा तलावामध्ये विसर्जित करा.कारण तुळशीचे सुकलेले रोप घरात ठेवणे शुभ नाही.असे म्हटले जाते की जर घरात एखादे संकट येणार असेल तर घरातील तुळशीचे रोप सुकत जाते.

  5. संध्याकाळी कधीच तुळशीला स्पर्श करू नका 

  सायंकाळी तुळस आराम करत असते त्यामुळे त्यावेळी तुळशीच्या रोपाला हात लावू नये.

  6. दम्यावर तुळस रामबाण उपाय आहे 

  असे म्हणतात की दररोज थोडा वेळ तुळशीच्या रोपाजवळ बसले असता दम्याचा त्रास लवकर कमी होतो.

  7. प्रत्येक घरी असावे तुळशीचे रोप 

  तुळशीचे रोप प्रत्येक घरी असायलाच हवे असे म्हटले जाते कारण तुळशीचे केवळ अस्तित्वच एखाद्या वैद्याप्रमाणे काम करते.तुळशीच्या रोपामुळे आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात आणि घरातील लोकांना आरोग्य लाभते.म्हणूनच घरात तुळसीचे रोप असल्यास कुदृष्टीपासून कुटूंबाचे संरक्षण होते असे मानले जाते.