म्हणून प्रत्येक मंदिरात असते घंटा; ‘हे’ आहे शास्त्रीय कारण

मंदिराच्या घुमटाचा आणि मंदिरात लावलेल्या घंटांचा आपापसात संबंध आहे.  मंदिराच्या गाभाऱ्यात जो तळापासुन तर कळसा पर्यंतच्या भागाची रचना  वास्तूशास्त्रानुसार व स्वरविज्ञानाचे ज्ञान समुजुन केलेली असते.

    प्रत्येक मंदिरात जर एखादी गोष्ट सामान असेल तर ती आहे घंटा! मंदिरात  देवाचे दर्शन घेण्याआधी आपण घंटा अवश्य वाजवितो. मंदिरात घंटा लावण्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत तसेच काही वैज्ञानिक कारणेही आहेत.

    घंटानाद केल्यानंतर जो ध्वनी निर्माण होत असतो तो ऊँकाराच्या नादाशी मिळता जुळता आहे. पृथ्वी गोल गोल परिभ्रमण करतांना घंटानादा सारखा ओमचा ध्वनि येतो असे वैज्ञानिक सांगतात.

    घंटा किमान ७ सेकंद प्रतिध्वनी निर्माण करतात व वातावरणांत असलेल्या किटाणूंचा नाश करते यामुळेदेखील मंदिराची रचना ही वैज्ञानिक वास्तूशास्त्रानुसार केल्यानंतर ती भौतिकशास्त्रामधिल साउंडमधिल रिव्हरबरेश ऑफ साऊंड या नियमानुसार म्हणजेच प्रतिध्वनीनुसार करतात व घुमटाच्या ठिक केंद्र बिंदुखाली मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते व घंटा हे सप्तधातु समप्रमाणात घेऊन बनवल्या असतात.

    मंदिराच्या घुमटाचा आणि मंदिरात लावलेल्या घंटांचा आपापसात संबंध आहे.  मंदिराच्या गाभाऱ्यात जो तळापासुन तर कळसा पर्यंतच्या भागाची रचना  वास्तूशास्त्रानुसार व स्वरविज्ञानाचे ज्ञान समुजुन केलेली असते. घंटानादाचा  प्रतिध्वनी निर्माण होऊन ध्वनी हा मंदिरातिल गाभार्यातच लुप्त पावतो.
    ध्वनी हा मंदिरातिल गर्भ गृहामधिल मुर्तीमध्ये देखिल शोषला जातो. त्यामुळे ती मूर्ती साजकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनते.

    वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास घंटानादाचे अनेक लाभ आहेत.  घंटानादामुळे सप्तचक्रे जागृत होतात तसेच उजवा व डावा मेंदू सक्रिय होतो. घंटानादामुळे तयार होत असलेल्या व्हायब्रेशनने सकारात्मक ऊर्जा वाढते. अशावेळी मनात असलेली इच्छा बोलून दाखविल्यास किंवा एखादा दृढ निश्चय केल्यास आपले सुप्त मन त्याला स्वीकारते आणि त्यादिशेने कार्य करते.