…म्हणून उंदीर मारण्याच्या औषधालाही असते एक्सपायरी डेट!; आश्चर्यकारक आहे कारण

एक्क्सपरी डेट गेलेले विष उंदराने खाल्यास काय होईल? ते विष आणखी हानिकारक होऊन उंदीर पटकन मरेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे, कारण...

    औषधे, खाद्य पदार्थ, सोंदर्य प्रसाधने इत्यादी खरेदी करताना आपण नेहमी एक्सपायरी डेट तपासूनच खरेदी करतो, पण या व्यतिरिक्त आपण रॅट किल म्हणजेच उंदीर मारायचे औषध कधी एक्सपायरी डेट बघून खरेदी केले आहे का? हा प्रश्न हास्यास्पद असला तरी आपल्या सामान्य ज्ञानात भर घालणारा आहे.

    एक्क्सपरी डेट गेलेले विष उंदराने खाल्यास काय होईल? ते विष आणखी हानिकारक होऊन उंदीर पटकन मरेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे, कारण उंदीर मारायचे विष हे काही विशिष्ट रसायन एकत्रित करून बनविले असते. प्रत्येक रसायनाच्या प्रभावाचा काही ठराविक कालावधी असतो. तो कालावधी उलटून गेल्यानंतर त्या सरायणाचा प्रभाव कमी होतो तर कधी निष्क्रिय होतो. याचा अर्थ एक्सपायरी डेट गेलेले औषध जर उंदराने खाल्ले तर त्याने तो उंदीर मरेलच असे आवश्यक नाही.  म्हणून यापुढे जर कधी उंदीर मारायचे  औषध विकत घ्यायला गेलात तर त्याची एक्सपायरी डेट नक्की तपासा.