एकविसाव्या शतकातही कायम आहे महाभारतातील ‘या’ शापांचा प्रभाव!

महाभारताच्या शेवटच्या दिवसांत अश्वस्थमाने पांडवपुत्रांचा विश्वासघात केला. यानंतर संतप्त पांडव आणि श्रीकृष्ण अश्वस्थमाचा पाठलाग करून महर्षी वेद व्यासांच्या आश्रमात पोहोचले.

  महाभारताला हजारो वर्षे उलटून गेली असली तरी त्या काळाच्या अशा बर्‍याच घटना घडल्या असून अजूनही लोकांची उत्सुकता त्यात कायम आहे. महाभारतात काळाशी संबंधित असे अनेक शाप आणि वरदान आहेत, ज्याचा परिणाम आजही दिसून येतो. चला तर मग जाणून घेऊया महाभारत काळाशी संबंधित अशा शापांबद्दल…

  जेव्हा महाभारताच्या युद्धात दानवीर कर्ण  मारला गेला, त्यावेळी माता कुंती पांडवांकडे गेली आणि सांगितले की कर्ण तुमचा मोठा भाऊ होता. हे ऐकून पांडव दु: खी झाले. यानंतर जेव्हा संपूर्ण कुटुंब शोकमय स्थितीत होते तेव्हा युधिष्ठिर माता कुंतीकडे गेले आणि तिला शाप दिला की जगातील कोणतीही स्त्री आजपासून कोणतेच रहस्य लपवू शकणार नाही.

  महाभारत युद्धाच्या अगोदर अर्जुन स्वर्गातील दिव्यस्त्राचे शिक्षण घेण्यासाठी गेला. तेथे उर्वशी नावाची अप्सरा अर्जुनावर मोहित होते. यानंतर, जेव्हा उर्वशी तिचे विचार अर्जुनला सांगते, तेव्हा अर्जुन उर्वशीला त्याची आई म्हणून संबोधतो.

  महाभारताच्या शेवटच्या दिवसांत अश्वस्थमाने पांडवपुत्रांचा विश्वासघात केला. यानंतर संतप्त पांडव आणि श्रीकृष्ण अश्वस्थमाचा पाठलाग करून महर्षी वेद व्यासांच्या आश्रमात पोहोचले. स्वत: ला असुरक्षित वाटून अश्वस्थमाने त्याचे रक्षण करण्यासाठी ब्रह्मास्त्रांचा उपयोग केला, अर्जुनाने देखील ब्रह्मास्त्र वापरला.

  यानंतर वेद व्यास यांनी शस्त्रे वापरण्यापासून रोखले आणि शस्त्रे मागे घेण्याचे आदेश दिले. अर्जुनाने शस्त्र मागे घेतले तर अश्वस्थमाने शस्त्रांची दिशा बदलून अभिमन्यूची पत्नी उत्तराच्या गर्भात सोडला. यामुळे संतप्त होऊन श्रीकृष्णाने अश्वस्थामाला ३००० वर्षे पृथ्वीवर भटकत राहण्याचा शाप दिला.

  महाभारत काळात मांडव्य ऋषीचेही वर्णन आहे. खरंतर एकदा राजाने चुकून मांडव्य ऋषीला फासावर लटकवण्याचे आदेश दिले. यानंतर, त्यांना फासावर देण्यात आले, परंतु खूप वेळेपर्यंत त्यांचे प्राण गेले नाही. यानंतर राजाला चूक लक्षात आली आणि मांडव्य ऋषीला खाली उतरवण्यात आले.

  यानंतर ऋषींनी यमराजला भेट दिली आणि शिक्षेचे कारण विचारले, तेव्हा यमराज म्हणाले की, वयाच्या १२ व्या वर्षी तुम्ही एका किड्याच्या शेपटीत सुई टोचली होती. हे ऐकून ऋषी संतप्त झाले आणि ते म्हणाले की या वयात कोणालाही धर्म आणि अधर्म याची माहिती नसते, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही या पृथ्वीवर एक दासीपुत्र म्हणून जन्मास याल.

  महाभारताच्या युद्धामध्ये कौरव घराण्याचा अंत झाला. माता गांधारी यांनी आपले १०० मुल गमावले. यानंतर जेव्हा श्री कृष्ण त्यांना भेटायला गेले तेव्हा रागाच्या भरात माता गांधारी म्हणतात की ज्याप्रमाणे माझे १०० पुत्र मरण पावले आहेत त्याचप्रमाणे तुमच्या यदु कुळातील लोक एकमेकांचा वध करून नष्ट होतील.