स्वयंपाक घरातल्या ‘या’ वस्तू कधीच संपू देऊ नये; जाणून घ्या कारण

या वस्तू नेहमी थोड्या जास्त प्रमाणात आणल्या पाहिजेत किंवा संपण्यापूर्वीच आणायला हव्यात. जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते.

    स्वयंपाक घर ही घरातली अशी एक जागा आहे त्या जागेतून सर्व सदस्यांचे पोषण होते म्हणून तर स्वयंपाक घरात काही दोष असतील तर त्याचा विपरीत परिणाम घरातील सर्व सदस्यांवर होतो. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरातल्या काही वस्तू कधीही संपू देऊ नये.

    या वस्तू नेहमी थोड्या जास्त प्रमाणात आणल्या पाहिजेत किंवा संपण्यापूर्वीच आणायला हव्यात. जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते. अशा कोणत्या वस्तू आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या वस्तू कधीही संपू द्यायच्या नसतात. आपल्या आहारामध्ये मीठ हा सर्वात महत्वाचा घटक पदार्थ आहे.

    मीठ हे प्रत्येक घरांमध्ये उपलब्ध असते वास्तुशास्त्रानुर घरातले मीठ कधीही संपू देऊ नये. मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरात आणून ठेवायला हवे. घरातील मीठ संपणे हे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून चुकीचे आहे.  यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करते.

    याशिवाय त्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रिया वर पडतो तसेच घरात पैशासंदर्भात समस्या सुद्धा निर्माण होतात. हळद हा एक मसाल्याचा पदार्थ आहे तो अन्नामध्ये चव आणि सौंदर्य देखील वाढवतो. हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणामध्येसुद्धा केला जातो. भगवान विष्णू यांनासुद्धा हळद प्रिय आहे. घरात हळद संपणे म्हणजे गुरू ग्रहाचा दोष लागतो म्हणून घरात हळद कधीही संपू देऊ नये.

    (वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही माहिती देण्यात आली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कोणताही उद्देश नाही)