भारतातील ‘या’ ठिकाणचे लोकं हनुमानावर आहे नाराज; का ते जाणून घ्या

    उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात जोशीमठपासून ५० किमी अंतरावर नीती गाव आहे. याच गावात द्रोणागिरी पर्वत आहे. या गावातील लोक द्रोणागीरी पर्वतालाच आपला आराध्य देव मानतात.

    भगवान श्री. राम आणि रावणाच्या युद्धात मेघनादाच्या प्रहाराने लक्ष्मन बेशुद्ध झाले त्यावेळी संजीवनी बूटी घेण्यासाठी हनुमान याच द्रोणागिरी पर्वतावर आले होते परंतु हनुमानास संजीवनी ओळखता न आल्याने त्यांनी पर्वताचा एक भागच उपटुन श्री लंकेला नेला होता. नीती गावकऱ्यांच्या  म्हणण्यानुसार हनुमानाने पर्वताचा जो भाग उपटला तो पर्वत देवताचा उजवा हात होता. म्हणुनच द्रोणागीरीचे गावकरी हनुमानावर नाराज आहेत.

    हनुमानावर असलेल्या नाराजीमुळे येथील लोक मारुतीची पुजा देखील करत नाहीत, त्याचबरोबर द्रोणागीरी पर्वताची पुजा येथील लोक डाव्या हाताने करतात असं करण्यामागे गावकऱ्यांच म्हणणं आहे की, हनुमानाने पर्वताचा तो एक भाग त्याच्या उजव्या हातावर उचलून नेला होता म्हणुनच आमच्यात उजव्या हाताने पर्वत देवताची पुजा करणं मान्य नाही. गावतील लोकं वर्षातुन एकदा द्रोणागीरी पर्वताची पुजा देखील करतात. काही लोकांच्या म्हणण्यानुसार द्रोणागीरी पर्वताचा वरील भाग तोडल्याप्रमाणे दिसुन येतो. या गोष्टीला अगदी बद्रीनाथ धाम चे धर्माधिकारी भुवनचंद्र उनियालसुद्धा दुजोरा देतात.

    आता लंकेला जाऊयात

    रामभक्त हनुमानाचे पर्वताचा जो भाग तोडुन आणला होता तो लक्ष्मण बरे झाल्यावर तिथेच ठेवला. असं म्हणतात प्रभू श्रीरामाने मारुतीला आदेश दिला होता की, हा पर्वत जिथून आणलास तिथं परत नेऊन ठेव परंतु युद्धाच्या गडबडीत पर्वताचा तो तुकडा पुन्हा द्रोणागिरीवर न्यायचं मारुतीकडुन राहून गेलं. या अर्धवट पर्वताच्या तुकड्याला आज श्रीपद / रुमास्सला पर्वत / रहुमाशाला कांड आणि ( एडम्स पिक ) या नावाने ओळखले जाते.

    या पर्वतावर एक मंदिर देखील आहे. मंदिरातील एका जागी पायाचा छाप आहे. आणि हे पायाचे निशाण भगवान शिवशंकरांचे आहे असं मानलं जातं, आणि म्हणुनच या जागेला सिवानोलीपदम म्हणुन देखील ओळखले जाते.

    रामसेतु चा जसा ॲडम्स ब्रीज झालाय तसाच वरील श्रीपद पर्वताचा ॲडम्स पीक झालाय

    श्रीलंकेतील सर्वात सुंदर अश्या उनावटाना समुद्र किनार्यापासुन काही अंतरावरच हा पर्वत आहे. उनावाटाना चा अर्थ होतो आकाशातून पडलेला.

    असं म्हटलं जातं, हनुमान जेव्हा आकाशात उडत – उडत द्रोणागिरी पर्वत आणत होते तेव्हा त्या पर्वताचे काही तुकडे आकाशातून श्रीलंकेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पडले. असं म्हणतात श्रीलंकेच्या दक्षिणी समुद्रकिनार्‍यावर अशी भरपूर ठिकाणे आहेत जिथे द्रोनागिरी पर्वताचे तुकडे पडले होते. आणि विशेष म्हणजे जिथे जिथे हे तुकडे पडले त्या ठिकाणच्या मातीत बदल झाल्याचं दिसून आलं. काही लोकं असाही दावा करतात की येथील झाडे ही लंकेत मिळणारी नाहीत ते मूळ श्रीलंकेच्या झाडांपासून वेगळ्या स्वरूपाची आहेत म्हणजे त्यांचा अंदाज असा आहे की, ही झाडे मूळची इथली नव्हेच ही झाडे हिमालयाची आहेत.

    यात श्रीलंकेतील रीतीगला आणि नुवारा एलिया शहरापासून काही अंतरावर असलेल्या हाकागाला गार्डनचा देखील समावेश आहे या दोन्ही ठिकाणांमध्ये तेथील वातावरणात आढळुन येणाऱ्या आजुबाजुच्या वनस्पतींच्या ऐवजी वेगळ्याच वनस्पती आढळतात. बरेच लोकं या वनस्पतींना हिमालय कि जडीबुटी असं म्हणतात.
    अगदी हनुमानाच्या पाऊलाच्या ठस्यापासुन ते रावण जेथे आंघोळ करायचा त्या रावण फॉल्स या धबधब्यापर्यंत आजही श्रीलंकेत रामायणाशी संबंधित भरपूर जागा आहेत.