मृत्यूनंतर असा असतो आत्म्याचा प्रवास; पुन्हा परत येण्यासाठी आत्म्याला…

मृत्यू हा कोणाला चूकत नाही, तो सगळ्यांनाच येतो. प्रत्येक गोष्टीची सुरुवात झाली की त्या गोष्टीचा शेवट हा असतोच...

    सर्वसाधारणपणे  याची उत्सुकता सर्वांनाच असते की, मृत्यूनंतर नेमके काय होते?  मृत्यू हा कोणाला चूकत नाही, तो सगळ्यांनाच येतो. प्रत्येक गोष्टीची सुरुवात झाली की त्या गोष्टीचा शेवट हा असतोच. तसंच माणूस जन्माला आला की त्याचा शेवट हा मृत्यूने होतो, हा निसर्गाचा नियम आहे. मात्र माणसाचं मरण झाल्यावर त्याचा किती दिवसात पुनर्जन्म होतो असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो.

    याचे उत्तर अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला यात कुणी यशस्वी झाले तर कुणी त्याच नियमावर थांबले. त्यानंतर या सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नांना आता वेग आलेला दिसतो आणि यश आलं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. एका शोधानुसार ही गोष्ट समोर आली आहे की जेंव्हा १०० लोक श-रीराचा त्याग करतात त्यातून किमान ८५ लोक लगेचच अर्थात ३५ ते ४० आठवड्याच्या आत जन्म घेतात.