हा रहस्यमयी दगड देतो आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे; जाणून घ्या कुठे आहे हे ठिकाण

दगड आपल्या ठिकाणी स्थिर राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणजेच आपण प्रतीक्षा करावी असा याचा अर्थ असतो. आपण देखील स्वतः या मंदिरात येवून हे आश्चर्य स्वताच्या डोळ्याने पाहू शकता.

    माणूस कितीही ज्ञानी असला तरी त्याच्या मनात संभ्रम निर्माण करणारे प्रश्न हमखास पडतात. अशावेळी मनात एकाच काहूर माजतो आणि मग आपण त्या प्रश्नाच्या समधासाठी मार्ग शोधू लागतो. मनातल्या अशाच सुप्त प्रश्नांची उत्तरं जर एखादा दगड देतो असे जर तुम्हाला सांगितले ( Mysterious Stone) तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. एकविसाव्या शतकात हे स्वीकारणे जरी शक्य नसले तरी या दगडाबाबतची गोष्ट मात्र शास्वत सत्य आहे.

    आपल्या भारत देशात असे एक मंदिर आहे, जिथे एक दगड ठेवला गेला आहे. आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की आपण जर या दगडावर हाथ ठेवून आपल्या मनात एक प्रश्न विचाराल तर हा दगड रहस्यमयरित्या आपल्या मनातल्या त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्याच वेळी देतो.

    या दगडावर अनेक वैज्ञानिकांनी शोध केले आहेत. पण याचे हे रहस्य आजपर्यंत कोणाला समजले नाही की हा दगड इथे कसा काय आला असेल आणि त्याला इथे कोण ठेवले असेल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा दगड एखाद्या व्यक्तीचे मन जाणून कसे काय त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असेल हे कोणालाही कळत नाही.

    तुळजाभवानी महाराष्ट्रातील ( tuljabhavani temple maharashtra) प्रमुख साडे तीन शक्तीपीठातील एक पीठ आहे. मंदिराच्या ठीक मागे हा रहस्यमय दगड आहे. ज्यास चिंतामणी दगड असे म्हणले जाते. हा चिंतामणी दगड आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देवू शकतो. फक्त आपल्याला या चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हाथ या दगडावर ठेवायचे आहेत.

    यानंतर आपला प्रश्न मनातच या दगडास विचारयचा आहे. यानंतर जे घडते ते बघून लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. त्याचे होते असे की जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो आहे तर हा दगड उजव्या बाजूला वळतो. आणि जर प्रश्नाचे उत्तर नाही मध्ये असेल तर दगड डावीकडे वळू लागतो.

    आणि जर दगड आपल्या ठिकाणी स्थिर राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणजेच आपण प्रतीक्षा करावी असा याचा अर्थ असतो. आपण देखील स्वतः या मंदिरात येवून हे आश्चर्य स्वताच्या डोळ्याने पाहू शकता. पण हा चिंतामणी दगड कधी डावीकडे कधी उजवीकडे कसा बरा वळतो हे कोणत्याही वैज्ञानिकाला आजपर्यंत जाणून घेता आले नाही. यास तुळजाभवानी देवीचा एक चमत्कारच मानले जाते.

    (वरील पोस्ट उपलब्ध माहितीच्या आधारे टाकण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी कुठलाही संबंध नाही)