यंदाची महाशिवरात्री आहे खूप खास… नक्षत्रांच्या पंचकादरम्यान होणार साजरी ; जाणून घ्या मुहूर्त

यावेळी महाशिवरात्री २०२१ पंचक दरम्यान साजरी केली जाईल. घनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती या पाच नक्षत्रांच्या संयोजनास ‘पंचक’ असे म्हणतात. जेव्हा, चंद्र कुंभ आणि मीन राशीत संक्रमण करतो, तेव्हाच पंचक तयार होतो. परंतु, पंचक काळ शुभ मानला जात नाही. धर्मग्रंथात पंचक दरम्यान काही कामे करण्यास मनाई करण्यात आली आहे.

  मुंबई : प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. वर्षातील सर्व शिवरात्रींमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. यावेळी महाशिवरात्री ११ मार्च रोजी येत आहे. या दिवशीच समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर काही कथांनुसार, या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता.

  परंतु, यावेळी महाशिवरात्री २०२१ पंचक दरम्यान साजरी केली जाईल. घनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती या पाच नक्षत्रांच्या संयोजनास ‘पंचक’ असे म्हणतात. जेव्हा, चंद्र कुंभ आणि मीन राशीत संक्रमण करतो, तेव्हाच पंचक तयार होतो. परंतु, पंचक काळ शुभ मानला जात नाही. धर्मग्रंथात पंचक दरम्यान काही कामे करण्यास मनाई करण्यात आली आहे.

  किती वेळासाठी असेल पंचक काळ?
  हा पंचक काल ११ मार्च रोजी सकाळी ९.२१ वाजता सुरू होईल आणि १५ मार्चपर्यंत संपूर्ण दिवस असेल. यानंतर, तो १६ मार्च रोजी सकाळी ४.४४ वाजता समाप्त होईल.

  पंचक दरम्यान ‘ही’ कामे करण्यास आहे मनाई
  धर्मग्रंथानुसार पंचकच्या वेळी दक्षिणेकडे प्रवास करणे आणि लाकडी वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे. तसेच, या वेळी इमारत किंवा कामाच्या जागेची छप्पर उभी करू नयेत किंवा नव्याने बांधू नये. या नक्षत्रांच्या संयोजनात जर एखाद्याचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही मृत्यूचा धोका किंवा तितक्याच मोठ्या दु:खाची भीती असते. हेच कारण आहे की, पंचक काळात अंत्यसंस्कार करताना विशेष खबरदारी घेतली जाते, जेणेकरून कुटुंबातील इतर सदस्यांना संभाव्य धोक्यांपासून वाचवता येईल