उजव्या सोंडेचा गणपती आणि डाव्या सोंडेचा गणपती यात काय फरक आहे?; बाप्पाला घरी आणण्यापूर्वी नक्की वाचा

ज्या गणपतीची सोंड मध्यापासून उजवीकडे वळाली आहे असा. (गणपतीची उजवी बाजू, आणि बघणाऱ्याची डावी बाजू). उजवा म्हणजे दक्षिण मुखी, सूर्य नाडी असलेला समजले जाते. याच दिशेला यमलोक देखील आहे.

  उद्या घरोघरी बाप्पांचे (Bappa) आगमन होणार आहे. अनेकांनी गणेशमूर्ती (Ganesh) बुक केली असेल तर अनेकांनी ती स्वतः घरी बनविली असेल. गणेशाची मूर्ती ही दोन प्रकारची पाहायला मिळते. एक म्हणजे उजव्या सोंडेची तर दुसरी डाव्या सोंडेची. आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की या दोनही मूर्तींमध्ये नेमका फरक काय आहे? घरी मूर्ती आणताना ती कुठल्या सोंडेची असावी? याबद्दल जाणून घेऊया.

  १. डाव्या सोंडेचा गणपती: ज्या गणपतीची सोंड मध्यापासून डावीकडे वळाली आहे असा. (गणपतीची डावी बाजू, आणि बघणाऱ्याची उजवी बाजू). डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती. वाम म्हणजे डावी बाजू,उत्तर दिशा. डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे. ती शीतलता देते. तसेच उत्तर दिशा अध्यात्माला पूरक, आनंददायी आहे.

  या गणपतीला विशेष विधिवत पूजा करण्याची फारशी आवशकता नसते. साधारण पूजा पुरेशी असते.

  २. उजव्या सोंडेचा गणपती: ज्या गणपतीची सोंड मध्यापासून उजवीकडे वळाली आहे असा. (गणपतीची उजवी बाजू, आणि बघणाऱ्याची डावी बाजू). उजवा म्हणजे दक्षिण मुखी, सूर्य नाडी असलेला समजले जाते. याच दिशेला यमलोक देखील आहे. म्हणूनच या प्रकारच्या गणपतीला जो यमलोकाचा सामना करू शकतो (पाप पुण्याचा हिशोब ठेऊ शकतो), तेजस्वी (सूर्य नाडीचा), शक्तिशाली आणि जागृत मानला जाते.

  परंतु याच दिशेने रज लहरी देखील वाहत असल्याने त्याला अप्रिय देखील मानले जाते. जिवंतपणे दक्षिणेकडे तोंड करून बसल्यास (अथवा झोपताना दक्षिणेकडे पाय केल्यास) मृत्यूनंतर पाप-पुण्याची जशी छाननी होते, तशी व्हायला लागते. म्हणूनच पाप-पुण्याचे उत्तरदायित्व घेणाऱ्या प्रबळ व्यक्तीने याची पूजा करणे अपेक्षित असते.

  या गणपतीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे सांभाळून करणे आवश्‍यक असते. ती मूर्ती पूजेत ठेवणाऱ्याने विशेष काळजी घ्यावी लागते. खाली दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळणे यासाठी गरजेचे असते.

  या सर्व कडक नियमांमुळे साधारणतः घरी उजव्या सोंडेचा गणपती न बसविता, डाव्या सोंडेचा गणपती बसविला जातो.