जपमाळेत १०८ च मणी का असतात?; जाणून घ्या कारण

ज्योतिष शास्त्रानुसार ब्रह्मांडाला 12 भागांमध्ये विभाजित केले गेले आहे. या 12 भागांचे नाव मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत...

  सामान्यतः 24 तासांमध्ये व्यक्ती 21600 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासांमधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये व्यक्ती 10800 वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी-देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी 10800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे.

  या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. आणखी एका मान्यतेनुसार माळेमधील 108 मणी आणि सूर्याच्या कलांचा संबंध आहे. एक वर्षामध्ये सूर्य 21600 कला बदलतो. सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो. सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन. अशाप्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये 10800 वेळेस कला बदलतो. याच 10800 संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये 108 मण्यांची संख्या निश्चित केली आहे.

  माळेचा एक- एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतिक आहे. सूर्य एकमात्र साक्षात दिसणारे देवता आहेत.

  ज्योतिष शास्त्रानुसार ब्रह्मांडाला 12 भागांमध्ये विभाजित केले गेले आहे. या 12 भागांचे नाव मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत. या 12 राशींमध्ये नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू विचरण करतात. या 9 ग्रहांच्या संख्येचा गुणाकार 12 राशींशी केला तर 108 संख्या प्राप्त होते.
  माळेमधील मोत्यांची 108 संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते.

  आणखी एका मान्यतेनुसार ऋषीमुनींनी माळेमध्ये 108 मणी ठेवण्याच्या मागे ज्योतीषीय कारण सांगितले आहे.
  शास्त्रानुसार एकूण 27 नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि 27 नक्षत्रांचे एकूण 108 चरण
  असतात. माळेचा एक-एक मोती नक्षत्राचा एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो.