मंदिराच्या कळसाची सावली घरावर पडू नये असे का म्हणतात? जाणून घ्या खरे कारण

या संदर्भात दोन गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत - आजसुद्धा एखाद्या रस्त्याच्या बाजूला कुणी गगनचुंबी इमारत बांधू पाहिल तर त्या रस्त्याची रुंदी पुरेशी असल्याखेरीज तिला शासकीय परवानग्या दिल्या जाऊ नयेत असे नगर रचनेच्या नियमात आहे.

    पुर्वीच्या काळात मंदिरांना अनन्य साधारण महत्व होते. मंदिर हे सार्वजनिक ठिकाण आहे त्यामुळे विविध सण, उत्सव, जत्रा, महोत्सव, सार्वजनिक सभा इत्यादि कारणासाठी गावातील लोकं त्याठिकाणी एकत्र येत असत.  मोठ्याप्रमाणात लोकं एकत्र येऊन गर्दी होत असते त्यामुळे गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात टाळता यावे, सण व उत्सव योग्य रित्या साजरे करता यावे यासाठी मंदीराभोवती आवश्यक आणि पुरेशी जागा असावी लागते आणि त्यामुळे लोकांना मंदीराजवळ घर बांधू नये असे सांगणे किंवा त्याप्रमाणे वागणे लोकांना थोडं अवघडीचे होत असे असे होऊ नये म्हणुन मंदिराच्या कळसाची सावली घरावर पडू नये अशी एक रूढी परंपरा निर्माण केली गेली असावी ज्यामुळे मंदीरालगत परिसर रुंद आणि मोकळा रहावयास मदत होत असे, असे कारण यामागे कारण होते.

    या मान्यतेचा आणखी एक दुसरा पैलू आहे  मंदिराच्या कळसाची सावली घरावर पडू नये असे जुन्या काळात धर्माच्या नावाने सांगीतले असले तरी तसे म्हणण्याचे कारण केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होते.

    या संदर्भात दोन गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत – आजसुद्धा एखाद्या रस्त्याच्या बाजूला कुणी गगनचुंबी इमारत बांधू पाहिल तर त्या रस्त्याची रुंदी पुरेशी असल्याखेरीज तिला शासकीय परवानग्या दिल्या जाऊ नयेत असे नगर रचनेच्या नियमात आहे. इमारत कोसळल्यास तिच्या उंचीच्या १/३ एवढा  भाग हमखास संकटात सापडतो असे काहीसे ते गणित असते.

    दुसरीकडे नैसर्गिक वीज पडून नुकसान होऊ नये म्हणून उंच इमारतींवर जे lightening arrester बसवले जातात त्यांचे शीर्ष नेहमीच (कळसाप्रमाणेच) अणकुचीदार असते व ते उत्तम वाहक धातूचे बनवलेले असतात. म्हणजे ज्या काळात मंदिरे समृद्ध होती  व त्यांचे कळस सोन्या-चांदीसारख्या धातूंचे होते त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर घरे बांधली जावीत हे सर्वसामान्यांना अवगत ‘सावली’च्या भाषेत सांगितले गेले इतकेच!