…म्हणून घरातल्या देवघरात नसते शनी महाराजांची मूर्ती; जाणून घ्या कारण

शास्त्रानुसार शनिदेवाची मूर्ती घराच्या मंदिरात ठेवू नये, उलट असे म्हणतात की घराबाहेरच्या मंदिरात जाऊन शनी महाराजची पूजा करण्याचे विधान आहे. असे मानले जाते की, शनिदेवाला शाप मिळाला आहे की ते ज्यांना पाहतील त्याचा नाश होईल.

    मनःशांती आणि जीवनात सकारात्मक उर्जा यासाठी आपण पूजा पाठ आणि देवाची उपासना करतात. हिंदू परंपरेनुसार प्रत्येकाच्या घरात देवी-देवतांची मूर्ती ठेवून पूजा करतात.

    घरातील देवघरात आपण अनेक देवी देवतांचे मूर्ती ठेवतो मात्र शनी देवाची मूर्ती कधीच ठेवत नाही. यामागचे कारण अनेकांना माहिती नाही. जाणून घेऊया  शास्त्रानुसार शनी महाराजांची मूर्ती घरात का ठेवली जात नाही.

    शास्त्रानुसार शनिदेवाची मूर्ती घराच्या मंदिरात ठेवू नये, उलट असे म्हणतात की घराबाहेरच्या मंदिरात जाऊन शनी महाराजची पूजा करण्याचे विधान आहे. असे मानले जाते की, शनिदेवाला शाप मिळाला आहे की ते ज्यांना पाहतील त्याचा नाश होईल. आणि म्हणून शनिदेवाची दृष्टी टाळण्यासाठी त्यांची मूर्ती घरात ठेवू नये. जर तुम्ही मंदिरात शनिदेवाचे दर्शन घ्यायला गेलात तर त्यांच्या चेहऱ्याकडे न पाहता फक्त त्यांच्या पायाचे दर्शन घ्यावे.

    अशा परिस्थितीत तुम्हाला शनिदेवाची घरीच पूजा करायची असेल तर ते तुमच्या मनात ध्यान करून पूजा करा. तसेच शनिवारी हनुमानजीची पूजा करावी व शनिदेवाची आठवण करावी. याने शनीदेव खूष होतात.

    शनिदेवाशिवाय या देवांच्या मूर्ती घरी ठेवू नये –

    शनिदेव व्यतिरिक्त राहू-केतु, भैरव आणि नटराज यांच्या मूर्ती घरात ठेवल्या जात नाहीत. घराबाहेर त्यांची पूजा केली जाते. तथापि, आपण जेव्हा घरी असतो तेव्हा त्यांचे मनात ध्यान करू शकता.