
महाराष्ट्रात (Republic Day Maharashtra Tableau) आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक ठिकाणांचा समावेश आहे. या देवींच्या भव्य-दिव्य सुंदर प्रतिमांच्या माध्यमातून स्त्री शक्तीचे दर्शन यंदा प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथातून होणार आहे.
मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day Parade) नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ (Maharashtra Chitra Rath 2023) अशी थीम ठरवण्यात आल्याचं राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक ठिकाणांचा समावेश आहे. या देवींच्या भव्य-दिव्य सुंदर प्रतिमांच्या माध्यमातून स्त्री शक्तीचे दर्शन यंदा प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथातून होणार आहे. या चित्ररथाविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीतील कर्तव्य पथावर सहभाग घेणार..!
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान
‘साडेतीन शक्तिपीठे’ pic.twitter.com/KPssBy4dx1— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) January 23, 2023
चित्ररथाची मर्यादा, रंगीत तालीम आणि तयारी
चित्ररथांची लांबी ४५ फूट, उंची १६फूट आणि रुंदी १४ फूट अशी मर्यादित केलेली असते. चित्ररथ बांधणीसाठी मिलिटरी कॅन्टोन्मेंटमधील जंगलात संरक्षण मंत्रालयातर्फे कडक सुरक्षा व्यवस्थेसह मोठा कॅम्प उभारला जातो. कॅम्पमध्ये चित्ररथ बांधणीचे काम करण्यासाठी एक स्वतंत्र सपाट जागा उपलब्ध करून दिली जाते. बांधणीचे काम करणाऱ्या व्यक्तींकरिता, चित्ररथाशी निगडित सादरीकरण करणाऱ्या महिला आणि पुरुष कलाकारांकरिता स्वतंत्रपणे सुविधा दिल्या जातात. डॉक्टरांसह सर्व प्रकारची वैद्यकीय सुविधा त्यांना दिली जाते. दरवर्षी २३ जानेवारीला संचलनाची रंगीत तालीम होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रमुख पाहुणे इत्यादींच्या पेहरावातील कलाकार त्यात परफॉर्म करतात. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मूळ विषयाला अनुरूप संगीत, नाट्य आणि नृत्याचे सादरीकरण केले जाते. प्रत्येक चित्ररथाला ५८ ते ६२ सेकंद अशी वेळ दिलेली असते.
प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती’ महाराष्ट्राचा चित्ररथ.#RepublicDay pic.twitter.com/dcuQ8G6t7W
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) January 22, 2023
महाराष्ट्राचा खास रेकॉर्ड
हे संचलन १९५० पासून सुरू आहे, पण १९९३ ते ९५ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राने चित्ररथासाठी पारितोषिक पटकावले आहे. हा विक्रम आजवर कोणत्याही राज्याला मोडता आलेला नाही. महाराष्ट्राच्या योगदानावरचा पहिला चित्ररथ १९८६ साली राजपथावर प्रदर्शित झाला. २०१८ सालापर्यंत माझी एकूण वीसएक डिझाइन्स निवडली गेली. त्यापैकी सहा चित्ररथांना पारितोषिके मिळाली. १९९३, १९९४ आणि १९९५ ही सलग तीन वर्ष अनुक्रमे ‘गणेशोत्सव’, ‘हापूस आंबा’ आणि ‘बापू’ या चित्ररथांवर महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांकाची मोहर उमटवून हॅट्रिक केली.
दरम्यान, २०१४ साली महाराष्ट्राच्या चित्ररथात नारळी पौर्णिमेचे दर्शन देशाला घडले, २०१५ साली पंढरीची वारी सर्वश्रेष्ठ ठरली, तर २०१८ साली शिवराज्याभिषेकाच्या विषयाला प्रथम पारितोषिक मिळाले. २०२२ साली कास पठाराच्या विषयाद्वारे राज्याच्या जैवविविधतेचा चित्ररथ पुरस्कारप्राप्त ठरला नसला, तरी त्याचे कौतुक झाले होते.