शासनाच्या विद्यांजली प्रयत्नांवर विशेष लक्ष केंद्रित करून पीएनबीने प्रजासत्ताक दिन साजरा केला

सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारच्या विद्यांजली प्रयत्नांमध्ये योगदान देत, पीएनबी ने प्रजासत्ताक दिन २०२२ च्या निमित्ताने सीएसआर उपक्रम सुरू केले आहेत. बँकेने एसडीएमसी प्राथमिक कन्या विद्यालय दिल्लीला उदारपणे योगदान दिले आहे. पालम गाव, द्वारका येथील शाळेला संगणक आणि प्रिंटर देण्यात आले आहेत, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि घरी स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थिनींना अभ्यास साहित्याच्या हार्ड कॉपी देता येतील.

  • शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारच्या विद्यांजली प्रयत्नांचा एक भाग म्हणून पीएनबी ने सीएसआर उपक्रमांमध्ये योगदान दिले

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) ७३ वा प्रजासत्ताक दिन देशभक्ती आणि उत्साहाने साजरा केला. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सीएच एस.एस. मल्लिकार्जुन राव यांनी द्वारका, नवी दिल्ली मुख्यालय येथे राष्ट्रध्वज फडकावला. विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) अतुल गोयल, जे पुढील महिन्यात एमडी आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील, ते ईडी, सीव्हीओ, सीजीएम आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर उपस्थित होते.

स्वातंत्र्यसैनिक, सैनिक आणि आपल्या राज्यघटनेच्या रचनाकारांना अभिवादन करून सीएच एस.एस. मल्लिकार्जुन राव म्हणाले कोविड १९ च्या साथीच्या विरोधात संपूर्ण देश एकजुटीने लढला आहे आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली आहे.

पीएनबी परिवार या प्रसंगी उभा राहिला आहे तसेच सामान्य माणसाच्या आणि उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र काम केले आहे. आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यांचे कृतज्ञतेने स्मरण करत आहोत ज्यांनी साथीच्या रोगात प्राण गमावले आहेत. ग्राहक फोकस, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, प्रभावी आणि वेळेवर बदल समाविष्ट करण्यासाठी बँकेने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केला आहे. बँकेने सर्व क्षेत्रात आपली स्थिती सुधारली आहे आणि अतुल गोयल, एमडी आणि सीईओ यांच्या मार्गदर्शनाखाली ती नवीन उंची गाठेल.

सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारच्या विद्यांजली प्रयत्नांमध्ये योगदान देत, पीएनबीने प्रजासत्ताक दिन २०२२ च्या निमित्ताने सीएसआर उपक्रम सुरू केले आहेत. बँकेने एसडीएमसी प्राथमिक कन्या विद्यालय दिल्लीला उदारपणे योगदान दिले आहे. पालम गाव, द्वारका येथील शाळेला संगणक आणि प्रिंटर देण्यात आले आहेत, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि घरी स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थिनींना अभ्यास साहित्याच्या हार्ड कॉपी देता येतील.

राजपूर खुर्दमधील आणखी एक शाळा, मोहन गार्डनला व्यावसायिक आरओ सिस्टीम आणि तात्काळ आवश्यकतेनुसार बुक शेल्फ प्रदान करण्यात आले आहेत.

शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी गेल्या वर्षी विद्यांजली प्रयत्न सुरू केले होते.  शाळांमधील सह-शैक्षणिक उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी पायाभूत सुविधा, डिजिटल साधने, वर्गखोल्या, सहाय्यक साहित्य इत्यादींमध्ये योगदान दिले गेले आहे.