rahul gandhi tweet for republic day

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्विट (Rahul Gandhi Tweet For Republic Day) करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा देताना त्यांनी अमर जवान ज्योतीचा (Amar Jawan Jyoti) फोटो ट्विट केला आहे.

    आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) उत्साहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेक नेत्यांनी आणि कलाकारांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट (Rahul Gandhi Tweet For Republic Day) करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा देताना त्यांनी अमर जवान ज्योतीचा (Amar Jawan Jyoti) फोटो ट्विट केला आहे.

    “१९५० मध्ये प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाने आत्मविश्वासाने योग्य दिशेने पहिले पाऊल टाकले होते. सत्य आणि समतेच्या त्या पहिल्या पावलाला सलाम. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!,” असे लिहत त्यांनी अमर जवान ज्योतीचा फोटो ट्विट केला आहे.

    नवी दिल्लीतील इंडिया गेटवर गेली ५० वर्षे जळत असलेली अमर जवान ज्योती शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जळणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राहुल गांधींसह अनेकांनी टीका केली होती.हा युद्धातील हुतात्म्यांचा अपमान असल्याचे अनेकांनी म्हटले होते.