shivangi singh

वायुसेनेच्या (Air Force) चित्ररथामध्ये (Republic Day Parade)भारतातल्या पहिल्या महिला राफेल फायटर जेट पायलट शिवांगी सिंह (Shivangi Singh) यांनी भाग घेतला आहे.

    नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2022) निमित्ताने राजपथावरील परेडमध्ये वायुसेनेच्या (Air Force) टीममध्ये (Republic Day Parade)भारतातल्या पहिल्या महिला राफेल फायटर जेट पायलट शिवांगी सिंह (Shivangi Singh) यांनी भाग घेतला आहे. वायू सेनेच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील प्रदर्शनाचा भाग असलेल्या त्या फायटर जेट चालवणाऱ्या दुसऱ्या महिला वैमानिक आहे.

    गेल्या वर्षी फ्लाइट लेफ्टनंट भावना कंठ प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी वायूसेनेच्या टीममध्ये सामील झाल्या होत्या. वाराणसीच्या शिवांगी सिंह २०१७ मध्ये वायूसेनेमध्ये सहभागी झाल्या. फायटर प्लेन चालवणाऱ्या महिलांच्या दुसऱ्या तुकडीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. राफेल उडवण्याआधी त्या मिग – २१ बायसन विमान उडवत होत्या.

    शिवांगी पंजाबमधील अंबाला येथील वायूसेनेच्या गोल्डन ॲरोज स्क्वाड्रनचा भाग आहेत.
    वायूसेनेच्या प्रदर्शनाचे नाव ‘भारतीय वायू सेना भविष्यासाठी परिवर्तन’ असे आहे. या चित्ररथामध्ये मिग २१, जी-नेट, हलके लढाऊ हेलिकॉप्टर आणि राफेल विमानाचे स्केल डाऊन मॉडेलसह अश्लेषा रडारही प्रदर्शित करण्यात आले आहे.

    राफेल लढाऊ विमानाची पहिली बॅच २९ जुलै २०२० ला भारतात आणण्यात आली. फ्रान्सच्या ३६ लढाऊ विमानांच्या व्यवहारातील ३२ विमाने आत्तापर्यंत भारतात आली आहेत. उर्वरित ४ विमाने यावर्षी एप्रिलपर्यंत येतील.