Young man from Yavatmal gets the honor of setting the standard of biodiversity in Maharashtra by painting on the highway

यवतमाळ येथे साकारण्यात येणारी ही कलाकृती महाराष्ट्रातील जैवविविधतेची मानके या संकल्पनेवर आधारित आहे. महाराष्ट्र राज्यात आढळणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पती व प्रजातींच्या शिल्पाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

    यवतमाळ : प्रजासत्ताकदिना निमित्त राजपथावर देशातील सर्वच राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथातील विविध शिल्प सादर केले जातात. या वर्षी हे शिल्प तयार करण्याचे कंत्राट महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील एका कंपनीने मिळविले आहे. या चित्ररथामधील कलाकृती आणि शिल्प हे भूषण मानेकरच्या कला दालनामध्ये तयार करण्यात आले आहे. यवतमाळ (Yavatmal) येथील प्रसिद्ध कलावंत भूषण मानेकर (Bhushan Manekar) याला यावर्षी कला दालनाची निर्मिती तयार करण्याचा मन मिळाला आहे.      

    यवतमाळ (Yavatmal) येथील प्रसिद्ध कलावंत भूषण मानेकर (Bhushan Manekar) याला यावर्षी कला दालनाची निर्मिती तयार करण्याचा मन मिळाला आहे. या कलाकृतीत दर्शनी बाजूस ब्लू मॉरमॉन फुलपाखराची आठ फूट उंचीची देखणी प्रतिकृती शोभून दिसणार आहे. तसेच, दीड फूट उंचीचे राज्यफुल दर्शविणारे ताम्हण याचे अनेक गुच्छ दर्शविले आहेत. त्यावर इतर छोट्या फुलपाखरांच्या प्रतिमा शोभून दिसत आहेत. तर, चित्ररथावर पंधरा फूट भव्य असा शेकरू या राज्यप्राण्याची प्रतिमा आहे. तर, युनेस्कोच्या सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कास पठाराची प्रतिमा सुद्धा येथे दर्शविण्यात आलेली आहे. हे सर्व शिल्प भूषण मानेकर या कलावंत उत्तम रीतीने  साकारले आहे.
     
    प्रसिद्ध कलावंत भूषण मानेकर (Bhushan Manekar) यांच्या कला दालनामध्ये या सर्व कलाकृतीची निर्मिती करण्यात आली आहे. भूषण हा मानेकर या पेंटर कुटुंबीयांतील तिसरी पिढी आहे. आजोबा बालमुकुंद मानेकर, वडील अनिल मानेकर, काका नाना मानेकर यांच्यासह संपूर्ण मानेकर कुटुंबीय पंचक्रोशीत त्यांच्या कलाकृतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याला या शिल्प घडविण्याचे काळाचे बाळकडू बाल वयापासूनच मिळाले आहे. तसेच, त्याने  मुंबई येथील प्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट (Sir J. J. School of Art) येथून त्याने शिल्पकला विषयात २०२१ साली पदवी घेतली आहे. जन्मत: प्राप्त या कलात्मक गुणांना त्यांच्या पदवीने अजूनच निखराले आहे. त्यामुळेच त्याने एवढी मोठी झेप घेतली. तसेच, मुंबई येथील ललित कला केंद्र, सँड आर्ट फेस्टिव्हल, गुलबर्गा येथील आंतरराष्ट्रीय कला महोत्सव सुद्धा त्याच्या कलेचा गौरव करण्यात आला आहे.
     
    त्याने तयार केलेल्या या कलाकृती दोन दिवसाआधीच दिल्ली येथे पोहचणार आहे. त्या ठिकाणी या सर्व वेगवेगळ्या कलाकृती एकत्रित (असेम्बलिंग) करण्यात आल्या आहेत. विदर्भातील या यवतमाळ जिल्ह्याला येथील कलावंतांला मिळालेल्या बहुमानाने अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. हा चित्ररथ साकारण्याचा मान त्याला मिळाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.