sahitya sammelan

९४ व्या साहित्य संमेलनात(Sahitya Sammelan) ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नाशिकमधील १५० ते २०० कलावंतांचा आनंद यात्रा(Anandyatra In Sahitya Sammelan) ( सांस्कृतिक सोहळा ) हा कार्यक्रम सादर होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे दिग्दर्शन सचिन शिंदे व सहदिग्दर्शन विनोद राठोड यांनी दिली.

    नाशिक : नाशिकमध्ये(Nashik) होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनात(Sahitya Sammelan) ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नाशिकमधील १५० ते २०० कलावंतांचा आनंद यात्रा(Anandyatra In Sahitya Sammelan) ( सांस्कृतिक सोहळा ) हा कार्यक्रम सादर होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे दिग्दर्शन सचिन शिंदे व सहदिग्दर्शन विनोद राठोड यांनी दिली.

    या कार्यक्रमाची अधिक माहिती देताना ते म्हणाले, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रातिनिधिक दिवंगत साहित्यिकांच्या साहित्यावर हा कार्यक्रम आधारित आहे. या कार्यक्रमाचे लेखन प्राजक्त देशमुख यांनी केले असून मार्गदर्शन दत्ता पाटील यांचे आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शन सचिन शिंदे व सहदिग्दर्शन विनोद राठोड हे सांस्कृतिक प्रमुख करीत आहे. आनंद यात्रा या कार्यक्रमातून आम्ही साहित्य परंपरा , शाहिरी परंपरा , नाट्यपरंपरा , सामाजिक परंपरा , कवी परंपरा , कथा – कादंबरी परंपरा , लोक परंपरा व चित्रपट परंपरा इत्यादी प्रकारचे विभाग केले असून नृत्य नाट्य व माहितीपटाच्या आधारे सदर कार्यक्रम सादर होणार आहे.

    आनंदयात्रा कार्यक्रमासाठी तांत्रिक जबाबदारी पुढीलप्रमाणे आहे . प्रकाश योजना – विनोद राठोड, रंगभूषा – माणिक कानडे, वेशभूषा – अपूर्वा शौचे, संगीत संयोजन-आनंद ओक, ध्वनी संयोजन -रोहित सरोदे , जयंत ठोमरे, चित्रफीत संकलन – लक्ष्मण कोकणे समन्वयक अभय ओझरकर , श्रीराम वाघमारे.

    नाशिक मधील १५० ते २०० नाट्य व नृत्य कलावंत नाटक कविता व काही प्रसंगाचा नाटय आविष्कार सादर करणार आहे . नृत्य कलावंताना अदिती पानसे , सुमुखी अथणी , कीर्ती भवाळकर व प्रदीप गोरडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, असेही ते म्हणाले.