‘लष्कर ए ताेयबापेक्षा, लष्कर ए हाेयबा’ घातक ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यक्त व्हा परिसंवादात लेखक, कलावंत, सेलिब्रेटींना आवाहन

शेती हा जगातील प्राचीन उद्याेग असून त्याला हा दर्जा मिळाला नाही. शेती हा प्रश्न धार्मिक, आर्थिक आणि राजकीय आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लेखक, कलावंत आणि सेलिब्रिटींनी व्यक्त होत नाहीत, कारण ते कर भरत नाहीत. कारण त्यांचा शेतिशी संबंध नाही म्हणून ते यावर भूमिका घेत नाहीत असं विचारवंत आणि प्रा. हरी नरके यांनी म्हणाले.

    कुसुमाग्रजनगरी, नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज समारोपाचा दिवस आहे. आज सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयपणा, तसेच लेखक कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका! यावर सकाळी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लेखक, कलावंत आणि सेलिब्रिटींनी व्यक्त होत भूमिका घेतली पाहिजे, असं वक्त्यांनी मतं मांडली.

    …शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा नाही!
    सध्या ‘लष्कर ए तोयबा पेक्ष्या, लष्कर ए होयबा’ हे अधिक घातक आणि गंभीर आहे. दिल्लीमधील शेतकरी आंदोलनात लेखक. कवी, साहित्यिक, कलावंत आणि सेलिब्रिटि यांनी जी भूमिका घेतली पाहिजे होती, ती घेतली गेली नाही यांचे मला खंत आणि शल्य आहे. शेतकरी आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लेखक, कलावंत आणि सेलिब्रिटींनी व्यक्त होत भूमिका घेतली पाहिजे पण हे सर्व मूग गिळून गप्प बसले होते, हे खूप गंभीर आहे. भूमिका घेतली पाहिजे होती, पण तसे झाले नाही खूप समजासाठी वाईट आहे, असं मत जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी मांडले. तर १०० वर्षापूर्व जे शेतकरी यांचे प्रश्न होते, ते आजही आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लेखक, कलावंत, सेलिब्रिटींनी वेळेला जी भूमिका गरजेची होती, ती घेतली नाही. हे सर्वजण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. त्यांना शेतकरी यांचा प्रश्न मह्त्वाचा वाटला नाही, यांचे दुःख आहे असं परखड मत निशीकांत भालेराव यांनी मांडले.

    …शेवटी आत्महत्याच नशिबी
    पुढे परिसंवादात बोलताना, शैलेंद्र तनपुरे यांनी शेतकरी यांच्या विविध समस्येवर आपली मतं मांडली. मध्यम वर्गीय, पांढरपेशी या लोन्काना शेतकरी यांचे केवळ नुकसान दिसते. पण शेतकऱ्यांची दुःखे दिसत नाहीत. हे एवढे पीक फेकून देतात, मग यांना सुविधा काय म्हणून द्यायचे असं म्हणत आहेत. शेतकरी दिवसादिवस खंगत चाललेला आहे, म्हणून तो शेवटी कंटाळून आत्महत्या करत आहे. तर शेतकरी याचा प्रश्न हा खूप गुंतागुंतीचा आहे, शेतकरी आत्महत्या का करत आहेत, हा शोधाचा विषय आहे. शेती ही पूर्वी सारखी राहिली नाही. बापाने जसे मुलाशी दुशमन असणे, तसे सर्वजण शेतीचे शत्रू झाले आहेत. पारिवारिक वादाचे मूळ कारण म्हणजे शेती आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लेखक, कलावंत आणि सेलिब्रिटींनी भूमिका घेतली पाहिजे होती, पण ती घेतली गेली नाही. आणि या सर्वाकडून अपेक्षा करणे हे विचित्र आणि चुकीचे आहे, असं श्रीमंत माने यांनी म्हटले.

    शेतकऱ्यांचे शाेषण
    देशात ७० टक्के हे लोक शेती करत आहेत. आणि देशातील आधिक शेतकरी हे तोट्यात आहेत. आज तरुणांना शेतीतून बाहेर पडायचे आहे. शेतकरी दुखाचे मुख्य कारण म्हणजे शेतितील तोटा. शेतकरी यांच्याकडे बघण्याचा दुस्टीकोन विचित्र आहे. शेतकरी इतिहासात शेतकर-याची दुरावस्था आहे, प्रत्येक पातळीवर शेती आणि शेतकऱ्यांचे शोषण केले आहे. १९८० मध्ये नाशिकमध्ये कांद्यावर पहिले आंदोलन करण्यात आले. ते अजूनही होत आहे. शेतकरी प्रस्नावर राजसत्तेचा निर्दयपणा, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लेखक, कलावंत आणि सेलिब्रिटींचे मौन हे दिसून आले, असे विलास शिंदे यांनी म्हटले.

    यांनी घेतला सहभाग
    शेती हा जगातील प्राचीन उद्याेग असून त्याला हा दर्जा मिळाला नाही. शेती हा प्रश्न धार्मिक, आर्थिक आणि राजकीय आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लेखक, कलावंत आणि सेलिब्रिटींनी व्यक्त होत नाहीत, कारण ते कर भरत नाहीत. कारण त्यांचा शेतिशी संबंध नाही म्हणून ते यावर भूमिका घेत नाहीत असं विचारवंत आणि प्रा. हरी नरके यांनी म्हणाले. तर शेती हा कीव करणारा प्राणी आहे, असा जर लोन्कचा समज असेल तर हा खूप दुर्दैवी प्रकार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लेखक, कलावंत आणि सेलिब्रिटींनी व्यक्त होत नाहीत किंवा भूमिका घेत नाहीत, कारण त्यांना कमीपणा वाटत असेल अशी माझी शंका आहे असं शेषराव मोहिते यांनी म्हटले. या परिसंवादाला साहित्य रसिकांनी भरभरून पर्तिसाद दिला. या परीसंवादात पत्रकार संजय आवटे, शेषराव मोहिते, श्रीमंत माने, निशिकांत भालेराव, विलास शिंदे, शैलेंद्र तनपुरे हे सहभागी होते, तर सूत्रसंचालन हेमंत टकले यांनी केले.