Nashik: A large hall will be constructed for the meeting using German structure with long span

साधारण सात हजार लोकांची एकाच वेळी मोकळेपणे बसता येईल अशी व्यवस्था, त्याव्यतिरिक्त दोन्ही बाजूस मोकळी जागा आणि इतर सोयी, स्टेज च्या मागच्या बाजूला व्हीआयपी कक्ष व पुढील बाजूला मीडियासाठी जागा. त्यानंतर व्हीआयपी सेटिंग असेल.स्टेज ची साईज साधारण ८० फूट बाय ४५ फूट असेल(Nashik: A large hall will be constructed for the meeting using German structure with long span). अशी मािहती मंडप समिती प्रमूख रंजन ठाकरे,उप प्रमूख,वास्तुविशारद दिनेश जातेगांवकर यांनी दिली.

    नाशिक : साधारण सात हजार लोकांची एकाच वेळी मोकळेपणे बसता येईल अशी व्यवस्था, त्याव्यतिरिक्त दोन्ही बाजूस मोकळी जागा आणि इतर सोयी, स्टेज च्या मागच्या बाजूला व्हीआयपी कक्ष व पुढील बाजूला मीडियासाठी जागा. त्यानंतर व्हीआयपी सेटिंग असेल.स्टेज ची साईज साधारण ८० फूट बाय ४५ फूट असेल(Nashik: A large hall will be constructed for the meeting using German structure with long span). अशी मािहती मंडप समिती प्रमूख रंजन ठाकरे,उप प्रमूख,वास्तुविशारद दिनेश जातेगांवकर यांनी दिली.

    या संदर्भात अिधक मािहती देतांना ते म्हणाले,स्टेजवर तीन वेगवेगळ्या लेव्हल्स असतील. स्टेज च्या दोन्ही बाजूस एलईडी वॉल असतील. या पूर्ण सभागृहात येण्यासाठी साधारण पाच द्वार असतील सभाग्रहा नंतर मान्यवरांची जेवणाची व्यवस्था करण्यात येईल .्यानंतर किचनची व्यवस्था असेल. या पुर्ण सभागृहात एकूण वेगवेगळ्या ठिकाणी १२ एलईडी स्क्रीन असतील.

    जेणेकरून सभागृहात बसलेले श्राेते कुठल्याही अडचणी विना पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील,याव्यतिरिक्त संमेलन स्थळी एक उप मंडप असेल ज्याची क्षमता २५० ची असेल या उप मंडपाच्या व्यतिरिक्त इतर तीन सभागृहे असतील या सभागृहांची क्षमता दीडशे लोकांची असेल याव्यतिरिक्त बालकवी मंच, कवी कट्टा, गझल कट्टा, पुस्तक प्रदर्शन मंच आणि ग्रंथप्रदर्शन असेल , संमेलन नाशिकमध्ये होत असल्याने नाशिकचे वैभव विस्तृतपणे सांगणारे नाशिकचे पॅव्हेलियन येथे असेल. महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळावी यासाठी संमेलनामध्ये स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.असेही रंजन ठाकरे व दिनेश जातेगांवकर म्हणाले.