साहित्य संमेलनाच्या निमंत्रणावरून ‘मानापमान’ नाट्य रंगले; भाजप नेत्यांकडून बहिष्काराच्या इशाऱ्यातून आयोजकांचे वस्त्रहरण!

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह नाशिकच्या(Nashik) महापौर आणि केंद्रीय राज्यमंत्र्यासह भाजप आमदारांचा साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर(Political Drama On Sahitya Sammelan Invitation Card) उल्लेख नसल्याने मानापमान नाट्य रंगले आहे.

    मुंबई / नाशिक : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या(Sahitya Sammelan) उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजेरी लावणार की नाही याबाबत संभ्रम कायम असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह नाशिकच्या(Nashik) महापौर आणि केंद्रीय राज्यमंत्र्यासह भाजप आमदारांचा निमंत्रणपत्रिकेवर(Political Drama On Sahitya Sammelan Invitation Card) उल्लेख नसल्याने मानापमान नाट्य रंगले आहे. या नाट्यात प्रथम नागरीक असलेल्या महापौरांनी निषेध म्हणून संमेलनावर बहिष्काराचा पवित्रा घेत आयोजकांचे वस्त्रहरण केले आहे! मात्र संमेलनाच्या समारोपात शरद पवारांची(Sharad Pawar In Sahitya Sammelan) उपस्थिती राहणार आहेत.

    भाजप नेत्यांसह मान्यवरांची नावे वगळली
    नाशिक शहरात होणाऱ्या साहित्य संमेनात भाजप नेत्यांसह मान्यवरांची नावे कार्यक्रम पत्रिकेत वगळण्यात आल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी संमेलनावर बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह विरोधी पक्ष नेते फडणवीस, दरेकर, तसेच स्थानिक भाजप आमदार यांना साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. शिवाय या नेत्यांची नावे मुद्दाम वगळ्याचा आरोप करत महापौरांनी ग्रंथदिंडी व्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावणार नसल्याचे जाहीर केले आहे.

    महाविकास नेत्यांची मांदियाळी
    साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला प्रकृती ठिक असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. मात्र समारोप शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः मंत्री छगन भुजबळ आहेत. या शिवाय संमेलनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुर असे सत्ताधारी मंत्री आणि नेते हजेरी लावणार आहेत.

    कार्यक्रम मराठी भाषा विभागाचा
    दरम्यान, साहित्य महामंडळाने राजकीय व्यक्तींना साहित्य संमेलनात प्राधान्य न देता त्यांच्या उपस्थितीबाबत विशेष गाजावाजा न करण्याचे धोरण यापूर्वीच ठरविण्यात आले आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या साहित्य संमेलनातही स्वतः सांस्कृतिक मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख प्रेक्षकांमध्ये बसले होते. मात्र, नाशिकच्या समंलेनात हे संकेत बाजुला सारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या संमेलनातही सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचा नामोल्लेख निमंत्रण पत्रिकेत नसल्याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता हा कार्यक्रम मराठी भाषा विभागाचा असल्याने सांस्कृतिक कार्यमंत्र्याचा उल्लेखांचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सांगण्यात आले, मात्र मराठी रसिक श्रोते म्हणून सर्वानी उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी केला पाहिजे असे ते म्हणाले.

    निमंत्रकांचा माफीनामा
    या साहित्य संमेलनात केंद्रीय मंत्री भारती पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साधे संमेलनाचे निमंत्रणही देण्यात आले नाही. संमेलनासाठी निधी देणाऱ्या भाजपच्या तिन्ही आमदारांचा निमंत्रण पत्रिकेत साधा उल्लेखही नाही. महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. महापालिकेनेही संमेलनासाठी२५ लाखांचा निधी दिला त्यानंतरही भाजप नेत्यांना डावलण्यात येत असल्याने महापौर सतीश कुलकर्णी यानी निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर यांची हजेरी घेत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर निमंत्रक जातेगावकर यांनी महापौरांची माफी मागितल्याचे सांगण्यात येत आहे.