संमेलनस्थळी पुण्याचे दाेन प्रकाशक काेराेनाबाधित आढळल्याने खळबळ

नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी रविवारी पुण्याहून आलेले दोन प्रकाशक कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी महापालिकेची धावपळ सुरू झाली आहे.

    नाशिक : साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिक मध्ये आलेले पुण्यातील दोन प्रकाशक हे करोनापॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे दोघेजण पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

    याबाबत अधिक माहिती अशी की,  नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी रविवारी पुण्याहून आलेले दोन प्रकाशक कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी महापालिकेची धावपळ सुरू झाली आहे. या दोन व्यक्तींना बिटको रुग्णालयामध्ये किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला कळवून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे. साहित्य संमेलनासाठी दररोज हजारो श्रोते तसेच व्हीआयपी व्यक्ति येण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेने तपासणीसाठी वैद्यकीय विभागाचे पथक ठेवले होते.या पथकाने तपासणी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून आता त्यांच्या संपर्कात कोण कोण आले आहे याचा शोध महापालिकेच्या वतीने घेतला जात आहे.