पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपयांची मदत ; मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

पुरामध्ये लोकांचे खूप नुकसान झाले, पूरग्रस्त नागरिकांना आम्ही तात्काळ मदत म्हणून राज्य शासनाकडून दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. यामध्ये पाच हजार रोख तर पाच हजार रुपयांची मदत धान्याच्या स्वरूपात केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

  सांगली : सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपयांची तातडीची मदत करणार असल्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगली येथे पत्रकर परिषदेत केली.
  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सोमवारी सांगली जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, त्यांच्यासोबत कृषी राज्यमंत्री पंधरा मिनिटात विश्वजीत कदम, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
  ते म्हणाले, पुरामध्ये लोकांचे खूप नुकसान झाले, पूरग्रस्त नागरिकांना आम्ही तात्काळ मदत म्हणून राज्य शासनाकडून दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. यामध्ये पाच हजार रोख तर पाच हजार रुपयांची मदत धान्याच्या स्वरूपात केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
  गहू – तांदूळ केरोसीनची मदत
  मंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, पुरात लोकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे आम्ही तातडीची मदत म्हणून रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबाला दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू , आणि पाच लिटर केरोसीन आणि पाच किलो तूर डाळ अशी मदत केली जाणार असल्याचेही मंत्री कदम यांनी सांगितले.
  सांगली मध्ये डीसीसी सेंटर होणार
  आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासन डिस्ट्रिक्ट कमांड सेंटर विभागीय पातळीवर करणार आहोत, ते सेंटर सांगलीत होईल, तर प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफ च्या धर्तीवर तितकेच प्रशिक्षित दल स्थापन केले जाणार असल्याची घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.