सांगली जिल्ह्यात २०९ नवे कोरोनाबाधित रूग्ण

आज सांगली जिल्ह्यात २०९ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ हजार ७८८ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ३ हजार ७० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 शिराळा – सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज सांगली जिल्ह्यात २०९ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ हजार ७८८ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ३ हजार ७० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात तब्बल ३ हजार ५१८ कोरोनाबाधित इतके रूग्ण आढळले आहेत.   

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या दुप्पट रुग्णसंख्या मनपा विभागातील असल्याचं समजलं जात आहे. २ हजार ५१७ कोरोबाधित रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच काल शुक्रवारी १ हजार ७९ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यापैकी १७४ जण पॉझिटिव्ह आहेत. मात्र ८१६ अॅटीजन टेस्ट पैकी ४७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

 या भागात आढळले पॉझिटव्ह रूग्ण –

आटपाडी, कडेगाव, शिराळा, सांगली,मिरज, तासगाव, नागज, खानापूर, पलूस, मनपा, वाळवा, अशा ठिकाणी कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर   शुक्रवारच्या अहवालातील मृतांमध्ये तासगाव येथील ७२ व ७३ वर्षांचा पुरुष तसेच मिरज येथील ६९ व २८ वर्षांचा पुरुष आणि नागज येथील ५८ वर्षांची महिला असा समावेश आहे.