आगीत ४० एकरातील ऊस खाक ; कामेरीतील घटना , शेतकऱ्यांचे काेट्यवधीचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चाळीस एकरावरील ऊस जळून खाक झाला. वाळवा तालुक्यातील कामेरी येथे ही घटना घडली. तुजारपूर रोडवरील एक किलोमीटर परिसरातील ऊस आगीत भस्मसात झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील कामेरी परिसरातील कामेरी-तुजारपूर रोडवरील ऊसाच्या फडाला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुमारे ४० एकर क्षेत्रावरील उभा ऊस जाळून खाक झाला आहे. ऊसाच्या फडावरून गेलेल्या विजेच्या तारेत शॉर्टसर्किट झाल्याने सुरुवातीला आग लागली.

    सांगली : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चाळीस एकरावरील ऊस जळून खाक झाला. वाळवा तालुक्यातील कामेरी येथे ही घटना घडली. तुजारपूर रोडवरील एक किलोमीटर परिसरातील ऊस आगीत भस्मसात झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील कामेरी परिसरातील कामेरी-तुजारपूर रोडवरील ऊसाच्या फडाला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुमारे ४० एकर क्षेत्रावरील उभा ऊस जाळून खाक झाला आहे. ऊसाच्या फडावरून गेलेल्या विजेच्या तारेत शॉर्टसर्किट झाल्याने सुरुवातीला आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. एक किलोमीटर परिसरातील ४० एकर क्षेत्रात असणाऱ्या अनेक शेतकऱयांचा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ज्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारखान्यला गाळप करण्यायोग्य झालेला ऊस आगीत पूर्णपणे जळून खाक झाला. आगीत शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

     पाणी नसल्याने अग्निशमन दल हतबल

    आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. मात्र पाण्याने भरलेले बंब शिल्लक नसल्याचे कारण इस्लामपूर अग्निशमन विभागाकडून देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभाग लवकर पोहचले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र जाळून खाक झाले आहे.