याला म्हणतात मराठी हिसका; थेट सांगलीत दाखल झाली चीनी कंपनीती तक्रार

सांगली : चीनच्या एका कंपनीविरोधात सांगलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. चीनच्या मे. टी. मरीन मेकॅनिकल कंपनीने फसवणुक केल्याची तक्रार सांगलीतल्या पेंटागॉन कंपनीने कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे.

खरेदी केलेल्या हायड्रॉलिक जॅक पंप युनिटचे पैसे न देता फसवणूक केल्याची फिर्याद पेंटागॉन कंपनीचे अकाउंटंट मिलिंद मोहन सावंत यांनी केली आहे.  या फिर्यादीनुसार चीनमधील मे. टी. मरीन मेकॅनिकल कंपनी, नानतोंग, बारलेक्स बँकेचे पदाधिकारी आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  मे. टी. मरीन मेकॅनिकल कंपनीने सांगलीतल्या पेंटागॉन कंपनीकडून सुमारे साडे बारा लाखांचा माल खरेदी केला होता. यानुसार पेंटागॉन कंपनीने सर्व माल चीनला पाठवला. यानंतर या मालाचे पैसै बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केल्याचे चीनमधील कंपनीकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र पेंटागॉन कंपनीच्या खात्यावर पैसे जमा झालेच नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने पेंटागॉन इंडस्ट्रीजने पोलिसात धाव घेऊन चीनच्या कंपनीविरोधात फिर्याद दाखल केली.