दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापांची विक्री करणारी टोळी जेरबंद ; २५ लाखांचे ३ मांडूळ साप जप्त

कवठेमहांकाळ मध्ये ठिकाणी दुर्मिळ मांडूळ जातीचे साप विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे.सहा जणांना अटक करत त्यांच्याकडून तीन मांडूळ साप जप्त करण्यात आलेले आहेत.धन-दौलत व ऐश्वर्या मिळेल,अशी बतावणी करून या मांडूळ सापाची विक्री या टोळीकडून करण्यात येत होती.

सांगली : कवठेमहांकाळ मध्ये ठिकाणी दुर्मिळ मांडूळ जातीचे साप विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे.सहा जणांना अटक करत त्यांच्याकडून तीन मांडूळ साप जप्त करण्यात आलेले आहेत.धन-दौलत व ऐश्वर्या मिळेल,अशी बतावणी करून या मांडूळ सापाची विक्री या टोळीकडून करण्यात येत होती.

मांडूळ विक्री करणारी टोळी जेरबंद
कवठेमहांकाळ शहरामध्ये दुर्मिळ असणाऱ्या मांडूळ जातीच्या सापाची विक्री करणारी एक टोळी कवठेमहांकाळ पोलिसांनी जेरबंद केली आहे.सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.यावेळी या टोळीकडून ३ दुर्मिळ असणारे मांडूळ जातीचे साप जप्त करण्यात आले आहेत.याची किंमत अंदाजे २५ लाख इतकी असल्याचा समोर आला आहे.अटक करण्यात आलेल्यांच्या मध्ये गजानन सरगर वय २२,अशोक ओलेकर, वय ३१तिप्पणा पडवळे ,वय ३३ ,महादेव बेनाडे, वय ४९,सर्व राहणार सलगरे ,सांगली.तर युवराज मगदूम ,वय ४२,रा.इचलकरंजी, कोल्हापूर आणि विवेक बेनाडे ,वय २८,राहणार डोनेवाडी,जिल्हा बेळगाव, कर्नाटक,यांचा समावेश आहे.

मांडूळमुळे मिळते धन-दौलत ! 
या सापांच्या मुळे धन-दौलत मिळते,अशी बतावणी करून लोकांची फसवणूक करत विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती,त्यानंतर पोलिसांनी कवठेमहांकाळ येथील मेघराज मंदीर याठिकाणी सापळा रचून साप विक्रीसाठी आलेल्या सहा जणांच्या टोळीला अटक करत त्यांच्या ताब्यातील दुर्मिळ मांडूळ जातीचे साप जप्त करण्यात आलेल्या आहेत,तर सहा जणांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये वन कायद्या अंतर्गत अवैधरित्या साप बाळगणे व तसेच लोकांची फसवणूक करण्याचा उद्देश,असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.