दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे

शासनाच्या निर्णयानुसार या रस्त्यांची लांबी राष्ट्रीय महामार्ग झाली. त्यामुळे केंद्र शासनाला ते हस्तांतरित करावे लागले. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्ग काँक्रीटीकरण आणि सुधारण्याचे काम प्रगतीपथावर होते,अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    सांगली : कोल्हापूर ते सांगली दरम्यान रखडलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरण कामाला गती येणार आहे.यासंदर्भात धोरण आखण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. खासगीकरणांतर्गत बांधा वापरा हस्तांतरित करा,या तत्त्वावर हे काम  होणार आहे.तर यामुळे रखडलेले सांगली – कोल्हापूर प्रवास हा सुसाट होणार आहे.

    २० ऑक्टोबर २०१२ पासून सांगली -कोल्हापूर रस्त्याचे चौपदरीकरण सुरू झालं होतं.मात्र त्यानंतर २०१५ मध्ये काम अर्धवट असताना सुप्रीम कंपनी काम बंद केले होते.त्यानंतर या रस्त्याचे काम बंद पडला होता.आणि या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेक अपघात हो आहेत, त्याच बरोबर वाहनधारकांना ही या अर्धवट रस्त्या मोठा त्रास सहन करावा लागत होता.त्यामुळे या रस्ता चौपदरीकरण काम सुरू करून पूर्ण करण्याची मागणी होत होती.अखेर याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीला राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. साळुंखे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक पंदरकर, अधीक्षक अभियंता एस. माने, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कार्यकारी व्यवस्थापक एम. के. वाठोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव प्रज्ञा वाळके आदी अधिकारी उपस्थित होते.

    या वेळी शासनाच्या निर्णयानुसार या रस्त्यांची लांबी राष्ट्रीय महामार्ग झाली. त्यामुळे केंद्र शासनाला ते हस्तांतरित करावे लागले. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्ग काँक्रीटीकरण आणि सुधारण्याचे काम प्रगतीपथावर होते,अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी तांत्रिक बाबी जाणून घेत रस्त्याच्या चौपदरीकरण संदर्भातील कामासाठी शासनाकडून मान्यता घेऊन तातडीने धोरण ठरवून या कामाला गती द्यावी, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देत खासगीकरणांतर्गत बांधा वापरा हस्तांतरित करा, या तत्त्वावर हे काम होणार असल्याचे स्पष्ट केलं.

    त्यामुळे आता लवकरच सांगली कोल्हापूर चौपदरीकरण कामाला गती येऊन या महामार्गावरील सुसाट होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.