पुरपट्ट्यातील नागरिकांना घरे खाली करण्याच्या सूचना देताना महापालिका उपयुक्त राहुल रोकडे व इतर अधिकारी
पुरपट्ट्यातील नागरिकांना घरे खाली करण्याच्या सूचना देताना महापालिका उपयुक्त राहुल रोकडे व इतर अधिकारी

गतवर्षी आलेल्या महापुरात सांगली शहरातील सुमारे ४५ हजार नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले होते. त्यामुळे यंदा प्रशासन लवकरच पुराच्या तयारीला लागले आहे. पालकमंत्री आणि जलसंपदा मंतरु जयंत पाटील यांनी देखील जिल्ह्यातील नदी काठावरील भागात महापुराच्या तयारीसाठी बैठका घेऊन सूचना दिल्या आहेत.

    सांगली : गतवर्षी महापुरात सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा फटका बसला होता, त्याच पार्श्वभूमीवर आज सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रशासनाकडून पूरपट्ट्यातील घरे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

    सांगली शहराला गतवर्षी पुराचा वेढा पडला होता, महापुरात सर्वधिक नुकसान नदी काठावरील पूर पट्टायला बसला होता. सन 2005 साली आलेल्या महापुरात सांगली शहरात पूर पट्टा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये मगरमच कॉलनी, सुर्यवंशी प्लॉट, गाव भागातील परिसर, अशा पूर पट्ट्यात महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या पथकाने सुरक्षेसाठी घरे खाली करून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या.