सांगलीत वकिलांचा सायकल वार; दर गुरुवारी सायकलने न्यायालयात जाणार 

    सांगली/प्रवीण शिंदे/नवराष्ट्र न्यूज नेटवर्क :  वाढते वायू प्रदूषण, इंधन दरवाढ आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने सांगली जिल्हा वकील संघटनेने ” सायकल वार” नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सर्व वकील दर गुरुवारी न्यायालयात सायकलने जातात.

    सणघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत वकिलांनी गुरुवारपासून उपक्रमाला सुरवात केली.

    कोरोनाच्या कालावधीमध्ये सध्या आरोग्य विषयक काळजीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अशातच पेट्रोलच्या दारांना शंभरी पार केली आहे. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ऍड. प्रमोद भोकरे यांनी एक गुरुवार सायकलवार हि संकल्पना बार असोसिएशनच्या सदस्यांपुढे मांडली. उपक्रमात अँड भाऊसो पवार , जेष्ठ वकील अँड जयंत नवले , अँड किरण राजपूत, अँड शीतल मदवाने, अँड विक्रम पाटील,अँड विकास काळे, अँड सुधीर गडदे, अँड बसवराज होऊसगौडर, व इतर सभासद हे सायकल वरून कोर्टात गेले. त्यांचे स्वागत संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र लांडे , सह सचिव अँड शैलेश पाटील, सदस्य अँड दत्ता वठारे, ऍड सुभाष संकपाळ तसेच न्यायालयीन अधीक्षक महेश कुलकर्णी व जिल्हा न्यायाधीश यांचे स्वीय सहायक एन.टी. पाटील यांनी केले, दर गुरुवार सायकलवरून कोर्टात येण्याचे सर्वांना यावेळी आवाहन करण्यात आले.