gopichand padalkar file pettiton

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरीची भाषा होती. तो गर्व लोकांनी मोडून काढला,अशी तिखट प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar criticized ajit pawar)) यांनी दिली.

    सांगली : मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन केले. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे ५० ते ६० हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरीची भाषा होती. तो गर्व लोकांनी मोडून काढला,अशी तिखट प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar criticized ajit pawar)) यांनी दिली.

    देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदासंघातील पोटनिवडणुकीचीसुद्धा मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांचा विजय झाला. या विजयानंतर गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत प्रतिक्रिया दिली आहे.

    गोपीचंद पडळकर म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आज महाविकास आघाडीचा गर्व फोडण्यात आला. मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन लावले. राष्ट्रवादी नेते त्यांचा उमेदवार ५० ते ६० हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला.

    तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या राजकारणाविषयी भाष्य केले. त्यांनी यापुढेसुद्धा भाजपची विजयी घोडदौड कायम राहील असा दावा केला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहेत, असेसुद्धा वक्तव्य त्यांनी केले.