यंदा शेतीतून विक्रमी उत्पादन होईल, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना विश्वास

गेल्या वर्षी महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शेतीचे 12 टक्के उत्पन्न वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडून आधुनिक पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. चांगला पाऊस,यामुळे यंदाच्या वर्षी राज्यात शेतीचा विक्रमी उत्पादन होईल, असा विश्वास विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

    सांगली:  यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने आधुनिक पद्धतीने खरिपाचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी विक्रमी शेतीचे उत्पादन होईल,असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

    यंदाच्या वर्षी हवामान खात्याकडून वेळेत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे. राज्य सरकारकडून त्यादृष्टीने जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरिपाच्या बैठकी पार पडलेल्या आहेत.