मराठा आरक्षणासाठी सर्व राजे एकत्र आले; आरक्षण वाचवण्यासाठी आता ओबीसी समाजाचे नेतेही मावळे गोळा करणार

ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. ओबीसीच्या आरक्षात घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र जमवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

सांगली : आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले एकत्र आले आहेत. यानंतर आतचा ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी अठरापगड जातीचे मावळे गोळा करण्याची तयारी दर्शवली आहे.

ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. ओबीसीच्या आरक्षात घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र जमवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसीच्या कोट्यातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचे शेंडगे यांनी स्पष्ट केले.

आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा नुकताच साताऱ्यात पार पडला. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं, पण हे सरकार आरक्षणात खोडा घालतंय, अशी टीका छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी केली होती. तर, आम्हाला कुणाच्या ताटातील काही नको. दुसऱ्याचां लाभ काढून आम्हाला देऊ नका. सर्वांना न्याय दिला, मग आम्हाला का नाही? असा सवाल उपस्थित करत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षबाबत जाहीर भूमिका यावेळी मांडली.