याला म्हणतात मोठं मन! लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार : प्रतिक जयंत पाटील

आजच राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर युवा नेते प्रतिक जयंत पाटील यांनी स्वतःच्या लसीचे पैसे आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • प्रतिक जयंत पाटील यांचा कौतुकास्पद निर्णय

सांगली : लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे #Citizens4maharashtra या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार असल्याचा कौतुकास्पद निर्णय युवा नेते प्रतिक जयंत पाटील यांनी घेतला आहे.

आजच राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर युवा नेते प्रतिक जयंत पाटील यांनी स्वतःच्या लसीचे पैसे आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान आपल्याला शक्य असेल तर आपणही लसीचे पैसे #Citizens4maharashtra मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून द्या. आपल्या देशाला, आपल्या राज्याला मदतीचा हातभार लावण्याची सध्या गरज आहे असे आवाहनही प्रतिक पाटील यांनी तरुणांना केले आहे.

प्रतिक पाटील यांनी देशाप्रती, राज्याप्रती असलेली जबाबदारी म्हणून ही भूमिका घेतली आहे. दरम्यान प्रतिक पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे थोरले चिरंजीव आहेत.