There is no threat to the government, says Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai ...

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 50 वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांना आता केवळ कार्यालयीन कामकाज करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. तसेच रेमडेसीवीरचा साठा करू देणार नाही, त्याचबरोबर पोलिसांवर दबाव टाकल्याबदल गृहमंत्री कारवाईचा निर्णय घेतील,असा विश्वासही मंत्री देसाई यांनी व्यक्त केला आहे.

    सांगली : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 50 वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांना आता केवळ कार्यालयीन कामकाज करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. तसेच रेमडेसीवीरचा साठा करू देणार नाही, त्याचबरोबर पोलिसांवर दबाव टाकल्याबदल गृहमंत्री कारवाईचा निर्णय घेतील,असा विश्वासही मंत्री देसाई यांनी व्यक्त केला आहे.

    वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगली जिल्ह्यातील संचारबंदीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गृहराज्यमंत्री देसाई यांनी प्रत्यक्ष पोलिसांची नाकाबंदीची पाहणी करत जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त बाबत बैठक घेतली.

    गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे आणि रस्त्यावर सध्या अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलीस कर्मचारी अधिकारी यांना ही करण्याची लागण होत असल्याची बाब समोर येत आहे, विशेषता ज्या पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांचे वय अधिक आहे त्यांना याबाबत अधिक धोका आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून ज्या पोलिस कर्मचारी अधिकारी यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे, अशा पोलिसांना फील्ड वर्क न देता केवळ कार्यालयीन कामकाज देण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री देसाई यांनी यावेळी दिली.