सांगली जिल्हा कारागृहात तब्बल ६३ कैद्यांना कोरोनाची लागण

  • मिळालेल्या माहितीनुसार, ६३ कैद्यांपैकी एक कैद्याची कोरोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली होती. तसेच तो जामिनावर जेलबाहेर पडला आहे. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी धावधाव सुरू झाली आहे. सांगलीच्या जिल्हा कारागृहात एकाचवेळी ६३ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्हा आणि कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

सांगली : सांगली जिल्हा कारागृहातील तब्बल ६३ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी जेल प्रशासनाकडून जेलमधील ९४  बंदिवान आणि कर्मचारी यांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली होती. परंतु या कोरोना चाचणीचा अहवाल काल रविवारी रात्री आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६३ कैद्यांपैकी एक कैद्याची कोरोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली होती. तसेच तो जामिनावर जेलबाहेर पडला आहे. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी धावधाव सुरू झाली आहे. सांगलीच्या जिल्हा कारागृहात एकाचवेळी ६३  जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्हा आणि कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

त्याचप्रमाणे हे पॉझिटिव्ह आलेले सर्व कैदी हे अन्य कैद्यांसोबत एकत्र असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता खबरदारी म्हणून पॉझिटिव्ह कैद्यांचे अलगिकरण केले जाणार आहे. तसेच ५० वर्षांवरील कैद्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.