आष्ट्याचे उपनगराध्यक्ष शेरनबाब देवळे यांचा राजीनामा

    वाळवा : आष्टा नगरीचे विद्यमान उपनगराध्यक्ष व मुस्लिम समाजाचे नेते शेरनबाब देवळे यांनी आज उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्याकडे सुपूर्द केला. या पदासाठी जिल्हा बँकेचे संचालक झुंझारराव शिंदे यांचे सुपुत्र धैर्यशील शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.

    दोन महिन्यांपूर्वी स्वर्गीय विलासराव शिंदे यांचे खंदे समर्थक शेरनवाब देवळे यांची आष्टा नगरीच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी आज उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावेळी नगरसेवक विशालभाऊ शिंदे, माजी उपनगराध्यक्ष बाबासो सिध्द उपस्थित होते.