बीजली मल्ल संभाजी पवार यांचे निधन

महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. क्रीडा कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण केला होता. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे विष्णूअण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करून संभाजी पवार जायंट किलर ठरले हाेते. जनता दल आणि त्यांनतर भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.

    सांगली : सांगलीचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पैलवान संभाजी पवार यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बीजलीमल्ल म्हणून संभाजी पवार यांची ओळख होती. संभाजी पवार यांनी तीन वेळा सांगली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. गेले काही वर्षे ते पार्किन्सनच्या आजाराने त्रस्त होते. गतवर्षी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी हिमतीने मात केली होती. एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायच्या त्यांच्या खासियतीमुळे बिजली मल्ल म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. क्रीडा कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण केला होता. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे विष्णूअण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करून संभाजी पवार जायंट किलर ठरले हाेते. जनता दल आणि त्यांनतर भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.