सांगली : येथील कृष्णा नदीच्या भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, जि. प.अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते.
सांगली : येथील कृष्णा नदीच्या भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, जि. प.अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास पाच ते सात वेळा पत्राद्वारे आपल्याला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या वतीने अनेक वेळा आम्ही आपणास पत्र दिले. आमच्या एकही पत्रावर आपल्याकडून उत्तर आले नाही. आपल्याकडून त्यावर कोणतीही कारवाई देखील करण्यात आली नाही. शासनाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वारंवार अवमान केला गेला. याचाच फटका ओबीसी समाजाला बसला आहे.

    सांगली : ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण त्यांना परत मिळवून देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगलीतील कृष्णा नदीत उतरून आंदोलन केले. न्यायालयाने आदेश देऊन देखील राज्य शासनाने राज्य मागावर्गीय आयोगाचे गठन केले नासल्या बद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ आरक्षणाचा प्रश्न न मिटवल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

    आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी आरक्षणा लवकरात लवकर ‘राज्य मागासवर्गीय आयोगाचे’ गठन करावे. राज्यातील ओबीसी समाजाची माहिती जमा करून तो तत्काळ न्यायालयास सादर करावा.” न्यायालयाच्या या आदेशाला जवळपास पंधरा महिने झाले मात्र आजूनही आपण साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन नाही.

    विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास पाच ते सात वेळा पत्राद्वारे आपल्याला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या वतीने अनेक वेळा आम्ही आपणास पत्र दिले. आमच्या एकही पत्रावर आपल्याकडून उत्तर आले नाही. आपल्याकडून त्यावर कोणतीही कारवाई देखील करण्यात आली नाही. शासनाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वारंवार अवमान केला गेला. याचाच फटका ओबीसी समाजाला बसला आहे. लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करा! तसे झाले नाही तर आमच्याकडे आंदोलना शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.