खराब रस्त्यांमुळे सांगली जिल्ह्यातील नऊ गावांमधील बसेस बंदच, पावसाळ्यामुळे रस्त्यांची चाळण

एसटीचा मेंटेनन्स वाढल्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे . परंतु, या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे. कोरोनामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात असताना खड्यांचाही फटका बसत आहे .

    सांगली : पावसाळ्यामुळे सांगली जिल्ह्यातील नऊ रस्त्यांची चाळण झाली आहे . याचा फटका एसटी महामंडळालाही बसत आहेत . एसटी महामंडळाने या खड्यांमुळे नऊ गावांची वाहतूक बंद केली असून अनेक ठिकाणी इतर मार्गाने वळविली आहे.

    एसटीचा मेंटेनन्स वाढल्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे . परंतु, या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे. कोरोनामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात असताना खड्यांचाही फटका बसत आहे.

    अतिवृष्टी झाल्यामुळे वाळवा , पलूस , शिराळा , कडेगाव , मिरज आणि जत तालुक्यांतील रस्ते खराब झाले आहेत . काही रस्त्यांची देखभाल दुरुस्तीच न केल्यामुळे तेथील रस्ते खराब झाले आहेत . यामुळे या मार्गावरून बसेस चालवितांनाचालकाला कसरत करावी लागत आहे