Car and bike crash in Sangli; The biker flew directly into the air and ... Watch the thrilling video of the accident

सांगली : सांगलीतील अपघाताचा एक थराराक व्हिडिओ समोर आला. कारने बाईकला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की बाईकस्वार थेट हवेत उडाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

सांगलीच्या कुपवाड मधील यशवंतनगर मध्ये हा अपघात झाला आहे. एक वेगवान कार आणि बाईकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात  दुचाकीस्वार कारच्या समोरील बाजूस धडकून अक्षरशः हवेत उडाला आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.