Closed-door discussion with the Chief Minister; What topic did the two discuss?

मुख्यमंत्री आणि भिडे यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा सुरू होती. दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ते कोणालाच समजू शकले नाही. या चर्चेनंतर मुख्यमंत्री व भिडे खोलीतून बाहेर आले. भिडे यांनी चर्चेबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देणे टाळले.

    सांगली : जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी आढावा बैठकीनंतर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा केली. या चर्चेतील तपशील देण्याचे भिडे यांनी टाळले.

    मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची आढावा बैठक घेतली. त्यांनतर पत्रकार परिषद घेतली.

    मात्र, या दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्यासाठी भिडे सभागृहाच्या शेजारीच असणाऱ्या भूसंपादन कार्यालयात सुमारे तासभर प्रतीक्षा करत होते. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी भिडे यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली.