thane market crowd

जून, जुलैमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने निर्बंधांमध्ये सूट देण्यात येऊन सर्व व्यवहार दुपारी चारपर्यंत सुरू करण्यात आले होते. परंतु, गेल्या आठवड्यापासून या सर्व व्यवसायांना रात्री १० पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

    सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने सर्व व्यवहार रात्री १० पर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

    जून, जुलैमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने निर्बंधांमध्ये सूट देण्यात येऊन सर्व व्यवहार दुपारी चारपर्यंत सुरू करण्यात आले होते. परंतु, गेल्या आठवड्यापासून या सर्व व्यवसायांना रात्री १० पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

    रस्त्यावरील सर्व खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल, दुकाने, रस्त्यावरील इतर साहित्य विक्रीस परवानगी देण्यात आली होती. परंतु, आठवडा बाजारांवर मात्र बंदी कायम ठेवण्यात आली होती. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील सर्व आठवडा बाजार सुरू करावेत, अशी मागणी होत होती.