सांगली जिल्हा बँकेची तक्रार आता थेट पंतप्रधान मोदींकडे…

    सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Sangli District Central Co-operative Bank Ltd) व्यवहारांची चौकशी करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील फराटे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय कृषी व सहकार विभाग यांच्याकडे केली आहे.

    यापूर्वी सहकार व पणन संचालक यांच्याकडे बँकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी चौकशी समिती देखील नेमण्यात आली होती. मात्र, अचानक या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. त्यांनतर तक्रारदार सुनील फराटे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे.

    फराटे यांनी केलेल्या तक्रारीत म्हंटल आहे की, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनावश्यकपणे ३० ते ४० कोटी रुपये खर्च केले आहेत, बँकेचे इमारत बांधकाम, मुख्य कार्यालय आणि शाखांमधील फर्निचर खरेदी, एटीएम मशीन, पैसे मोजण्याचे मशीन, इत्यादी बाबींवर, आवश्यकता नसताना सुमारे ३० ते ४० कोटींचा खर्च केल्याचा आरोप केला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे या बँकेची आता केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.