विधानसभा अध्यक्षपदावर काँग्रेस ठाम ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर नानांचा दावा

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आमदारांच्या मतावर होते. आताच्या अधिवेशन काळात कोरोनाने अनेक मंत्री, आमदार बाधित झाले होते. शिवाय, अधिवेशन सुरु असतानाही अनेकजण बाधित झाले. त्यामुळे निवड घेणे अडचणीची होते. विधानसभेचे हे शंभरावे वर्ष आहे. त्याच्या अध्यक्षपदाला तितकेच महत्व आहे. अधिवेशनाच्या काळातच अध्यक्षपद व्हावे, अशी अपेक्षा होती, पण आमदार गैरहजर असल्याने अडचण झाली. महाविकास आघाडीकडे 171 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे मतदानाला घाबरण्याचे कारण नाही असे नाना पटोले म्हणाले.

    सांगली : महाराष्ट्र विधासभेसच्या अध्यक्षपदावरुन नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. विधानसभाध्यक्षपदाबाबत महाविकास आघाडीत चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अजुनही याबाबत काहीच निर्णय झाला नसलेला नाही. राज्याचे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच आहे. त्याबाबत आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठामपणे म्हटले आहे.

    येत्या महिनाभरात कोरोनाची स्थिती पाहून विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवड केली जाईल, अशी अपेक्षाही पटोले यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष पाटोले रविवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

    विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आमदारांच्या मतावर होते. आताच्या अधिवेशन काळात कोरोनाने अनेक मंत्री, आमदार बाधित झाले होते. शिवाय, अधिवेशन सुरु असतानाही अनेकजण बाधित झाले. त्यामुळे निवड घेणे अडचणीची होते. विधानसभेचे हे शंभरावे वर्ष आहे. त्याच्या अध्यक्षपदाला तितकेच महत्व आहे. अधिवेशनाच्या काळातच अध्यक्षपद व्हावे, अशी अपेक्षा होती, पण आमदार गैरहजर असल्याने अडचण झाली. महाविकास आघाडीकडे 171 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे मतदानाला घाबरण्याचे कारण नाही असेही नाना पटोले म्हणाले.

    शरद पवार यांनी अध्यक्षपदाबाबत केलेले एक वक्तव्य पुन्हा दुरुस्त केले आहे. त्यामुळे काही अडचण नाही. काँग्रेसचाच अध्यक्ष होणार यात शंका नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो आहोत. मार्च किंवा एप्रिलमध्ये विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडून द्यायची ही राज्याची परंपरा राहिली आहे. विरोधी पक्ष ही परंपरा मोडणार असेल तर तो त्यांचा विषय आहे.

    महाराष्ट्र हे काँग्रेसच्या विचारांचे राज्य आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसची परंपरा आहे. आम्हाला संघटनात्मक रचना मजबूत करायची आहे. राज्याच्या विकासाची दिशा पुढे नेण्याचा संकल्प आम्ही करू. राज्यातील स्थिती पाहिली तर बेरोजगारी आहे, शेतीची अवस्था बिकट आहे. केंद्र सरकार राज्याला मदत करत नाही. या गोष्टींतून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा संकल्प करेल आणि काँग्रेस नंबर एकचा पक्ष होईल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.