रयत क्रांती संघटनेकडून बेळगाव जिल्हा बांधणीस सुरुवात

सांगली (Sangli). आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेळगाव तालुकाध्यक्ष कल्लाप्पा कर्लेकर व प्रवीण सुतार यांनी आज इस्लामपूर येथे आमदार सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला.

यावेळी वैभव मिसळे हेही सोबत उपस्थित होते. रयत क्रांती संघटना बेळगाव जिल्ह्यात वाढविणे संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.