कोरोना हा रोगच नाही, जी माणसं मरतात ती xxx… संभाजी भिडेंनी डायरेक्ट शिवी हासडली

दारुची दुकाने उघडी. दारुच्या दुकानांना परवानगी आणि कुठं काय विकत बसलाय त्याला पोलीस लाठी मारतात. काय चावटपणा चाललाय? हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे असेही ते म्हणाले. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत संपूर्ण देशात. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गांxxx वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, अस म्हणत भिडे गुरुजींनी शिवी हासडली. कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. मास्क लावण्याची काही गरज नाही, हा सगळा मूर्खपणा असल्याचेही संभाजी भिडे म्हणाले.

  सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide)पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. कोरोनो आणि कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनबाबात बोलताना संभाजी भिडेंनी डायरेक्ट शिवी हासडली.
  कोरोना हा रोग नाही. कोरनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत असे भिडे म्हणाले.

  दारुची दुकाने उघडी. दारुच्या दुकानांना परवानगी आणि कुठं काय विकत बसलाय त्याला पोलीस लाठी मारतात. काय चावटपणा चाललाय? हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे असेही ते म्हणाले.

  मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत संपूर्ण देशात. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गांxxx वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, अस म्हणत भिडे गुरुजींनी शिवी हासडली.
  कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. मास्क लावण्याची काही गरज नाही, हा सगळा मूर्खपणा असल्याचेही संभाजी भिडे म्हणाले.

  लॉकडाऊनची गरज नाही. कोरोनाला त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार धरले आहे. कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा सुरु आहे. जे जगायचे ते जागतील, जे मारायचे ते मारतील कोरोना अस्तित्वात नाही. लॉकडाऊनची गरज नाही. सरकारने काही कारू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे, असंही ते म्हणाले.